सुजय विखे पाटलांचे हे वक्तव्य ऐकून पक्षातील नेत्यांमध्ये चर्चांना उधाण

हे वक्तव्य ऐकून भाजप पक्षाला दगाफटका तर देणार नाही अशी कुजबुज सध्या  नेत्यांमध्ये तसंच नागरिकांमध्ये सुरू आहे.

सुजय विखे पाटलांचे हे वक्तव्य ऐकून पक्षातील नेत्यांमध्ये चर्चांना उधाण
आठवडा भरापासून अहमदनगर येथील भाजपचे खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या मतरदार संघामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मेळाव्यांचे देखील आयोजन केले होते. शनिवारी पारनेर येथे एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने खासदार सुजय विखे यांनी वक्तव्य केले.
खासदार विखे म्हणाले की मी जिल्ह्याचा खासदार आहे त्यातला ५०% वाटा हा शिवसेनेचा आहे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच मी शिवसेनेच्या विरोधात गेलो नाही. कधी शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात गेलो नाही एवढंच काय कुठल्याही शिवसेनेच्या तालुका अध्यक्षाच्या मी विरोधात नाही. माझ्या पक्षातील अनेक नेते शिवसेना पक्षात गेले पण मला याचं काहीही वाटलं नाही. मी ठामपणे सांगतो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती एकनिष्ठ राहील.
माझ्यावर देवेंद्र फडणवीसांनी तसंच नरेंद्र मोदी यांनी तक्रार केली तरीही चालेल पण मी शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही. हे मी ठामपणे सांगतो असं भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले. त्यांचं हे वक्तव्य ऐकून भाजप पक्षाला दगाफटका तर देणार नाही अशी कुजबुज सध्या  नेत्यांमध्ये तसंच नागरिकांमध्ये सुरू आहे.
Exit mobile version