Wednesday, September 25, 2024

Latest Posts

आंदोलनात साथ द्या आणि सत्ताधार्यांना…. राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाचा निर्धार मेळावा घेणार आहेत. यात राज ठाकरे यांचे जाहीर भाषण देखील होणार आहे. या मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एल्गार पुकारणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाचा निर्धार मेळावा घेणार आहेत. यात राज ठाकरे यांचे जाहीर भाषण देखील होणार आहे. या मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एल्गार पुकारणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधिच्या पोस्टर्समध्ये ‘रखडेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा’ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतात, कुणावर टीकेची झोड उठवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या भाषणा दरम्यान राज ठाकरे कोणावर टीका करणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे यांनी माहिती देताना सांगितले, २००७ साली मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्य़ाच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य अजून देखील मला आहे. खड्ड्यातून गेलो आणि मेलो काय? असा सवाल राज यांनी मतदारांना विचारला. मुंबई गोवा महामार्गावर १५५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. नितीन ग़डकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की मी घातले लक्ष पण कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेलेत. यामागे कोणाचे काही काम तर सुरु नाहीय ना? कोकणातल्या जमिनी आहेत त्या धडाधड परप्रांतीयांच्या घशात गेल्या आहेत. नाणार रद्द होतोय हे पाहून बारसू सुरु झाले. तसेच आत्तापर्यंत जेवढ्या सत्ता महाराष्ट्र्रात आल्या आहेत त्यांना तुम्ही दरवेळेस निवडून देता त्यांना तुम्हाला एकदा तरी धडा शिकवावा असे नाही का वाटले? असा सत्ताधार्यांना आणि केंद्रातील बड्या नेत्यांना टोमणा लगावला आहे.

रस्ते बांधायला १५-१७ वर्षे लागतात का, समृद्धी महामार्ग चार वर्षांत होतो. मग कोकणातचे खासदार आमदार काय करतायत कोण बोलतेय गडकरींशी, काय करतात हे लोक, असा सवाल करत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आंदोलन करण्याचे आदेश दिले. दरडी कोसळतायत, त्यात माणसे जातायत. अमेरिकेच एम्पायर इस्टेट बिल्डिंग चौदा महिन्यात बांधली गेली. इकडे १४-१४ वर्षे लागतायत. दुसऱ्या महायुद्धानंतर मंदी आली तेव्हा लोकांमध्ये पैसे तर गेले पाहिजेत. त्यांनी सर्वात आधी रस्ते बांधायला काढले. ते जे सरळ रस्ते दिसतात ते तेव्हा बांधलेले आहेत. तिथेही लोकांनी विरोध केला. तिथल्या राज्यकर्त्याने म्हटले होते की आजची अमेरिकेची पिढी मला शाप देईल, परंतू भविष्य़ातल्या सगळ्या पिढ्या मला आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी सांगितलेले की हवेत उडणाऱ्या बसेस आणणार, लवकर आणा. कोणाच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

पक्ष म्हणून आता तुम्हाला सर्वांना या आंदोलनामध्ये उतरावे लागणार आहे.असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे.यामध्ये राज ठाकरे यांनी पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला काम करावे लागणार आहे असे देखील सांगितले आहे. लोकांना त्रास न देता आपण आंदोलन असे झाले पाहिजे की सरकार हलले पाहिजे. लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे. तुमचे कोकणावर लक्ष असले पाहिजे. कोण जमिनी पळवतेय ते पहा, कोकणात उद्योग आले पाहिजेत, परंतू, सौदर्य राखून आले पाहिजे. असा प्रदेश सहसा मिळत नाही. परमेश्वराने महाराष्ट्रावर कृपा केलेली आहे. असे आंदोलन करा की सरकारला अशा प्रकारचे आंदोलन झाले होते अशी भीती वाटली पाहिजे. जिथे माझी गरज लागेल तिथे मला बोलवा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले.

हे ही वाचा:

MNS LIVE : राज ठाकरे यांनी केले थेट जनतेला आवाहन बदल हवे असतील तर …

महाविकास आघाडीत संभ्रम नसल्याचं संजय राऊतांनीही स्पष्ट केलं, सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss