MVA Live, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा

MVA Live, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी सर्व पक्ष रिंगणात उतरले आहेत. पण काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीमध्ये समन्व्य नसल्याचं दिसून आलं होतं. पण आज महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. या चर्चेमध्ये महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आले आहे. तर नागपूरमध्ये सुधाकर आडबाळे यांना महाविकास विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. तर सत्यजित तांबे यांच्यावर आजच कारवाई होणार असं नाना पाटोले यांनी सांगितलं.

नाशिक- शुभांगी पाटील, नागपूर- सुधाकर आडबाले, कोकण- बाळाराम पाटील, औरंगाबाद- विक्रम काळे, अशी नावे घोषीत करण्यात आली आहेत. या उमेदवारांची अधिकृत घोषणा काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदारा जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाचही जागा जिंकणार, मागच्या 5 वर्षात केंद्राने जनतेची गळचेपी केली, ज्या राज्यात आमची सत्ता आली त्या राज्यात आम्ही जुनी पेन्शन लागू केली आहे. यामुळे जनता आमच्या पाठीशी राहत असल्याचे नाना पटोले म्हणाले. जगात मोठा पक्ष म्हणून गवगवा करणाऱ्या भाजपला नाशिकसारख्या ठिकाणी भाजपला नेता मिळाला नाही. यासगळ्याचा विचार केला तर नाशिकसह पाचही विधानपरिषदेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार यात शंका नाही.

हे ही वाचा:

मोठी बातमी ! राखी सावंतला केली मुंबई पोलिसांनी अटक

विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version