संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची पक्ष प्रमुखांना तक्रार

संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची पक्ष प्रमुखांना तक्रार

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये असलेले संतोष बांगर यांनी बंद करून शिंदे गटात शामिल झाले त्या नंतर ते वारंवार चर्चेचा विषय बनला आहेत. आधी एक सरकारी कामकाज करणाऱ्याला कानाखाली मारली, त्या नंतर काही शिवसैनिकांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केल्यावर संतोष बांगर चांगलेच चर्चेत होते. पण आता संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत असून, वादात अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून महिला पदाधिकाऱ्याची विचारपूस केली आहे.

संतोष बांगर यांच्या कथित समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हा समर्थक अयोध्या पोळ यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचं ऐकू येत आहे. त्यानंतर शिवसैनिकांन कडून तीव्र निषेद करण्यात येत आहे. फेसबुकवरील एका पोस्टबाबत जाब विचारताना हा समर्थक अयोध्या पोळ यांना वारंवार हिंगोलीत येण्याचं आवाहन देत असल्याचंही यात दिसत आहे. ‘संतोष बांगर तुझा बाप आहे’, अशा भाषेत हा समर्थक त्यांच्याशी संवाद साधतो.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पोळ यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला. अयोध्या पोळनी शिवसेना पक्ष प्रमुख यांना घडलेल्या घटनेची तक्रार केली आहे. साहेब, मला ना जेव्हापासून ही गद्दारी झाली तेव्हापासून रोज प्रॉब्लेम आहे. मुंबईत मी एकटीच असते, बाकी सगळे परभणी जिल्ह्यात पालममध्ये असतात. मी भायखळ्यात १९ व्या मजल्यावर राहते. २३ व्या मजल्यावर रेकी करण्यासाठी काही मुलींना ठेवलं आहे. अशी तक्रार अयोध्या पोळनी उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. त्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पोळला बोलले, पहिलं म्हणजे रितसर तक्रार करुन ठेव. करणार काही नाहीत, फक्त ते असंच डिवचून-चिडवून चूक करायला लावतील. सीपींकडे सुद्धा रितसर तक्रार करुन ठेव म्हणून उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पोळला सांगितलं आहे.

हे ही वाचा:

Instagram : इंस्टाग्राम यूजर्ससाठी मोठी बातमी; नवं फिचर आले भेटीस

भारतात PFI संघटनेवर बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

‘मी माझ्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही..’ सैफ अली खानचा या वक्तव्यानंतर करीन सोशल मीडिया ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version