Sunday, June 30, 2024

Latest Posts

Supriya Sule Birthday: पक्षीय फूट झाल्यानंतर देखील मोठ्या संयमाने त्यांनी…Jitendra Awhad यांच्या अनोख्या शुभेच्छा

बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha Contituties) विजयी ठरलेल्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज ३० जून रोजी वाढदिवस. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी अनेक वेळा संसदरत्न पुरस्कार

आदरणीय साहेबांची मुलगी, अशी यांची एक ओळख असली तरी मोठ्या मेहनतीने आणि ताकदीने त्यांनी राजकीय क्षितिजावर आपल नाव कोरलं आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी अनेक वेळा संसदरत्न हा पुरस्कार पटकावला. पक्षीय फूट झाल्यानंतर देखील मोठ्या संयमाने त्यांनी ही लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीआधीचे ६ महिने त्यांनी बारामती लोकसभा क्षेत्रात तळ ठोकला आणि आपल्या नियोजनाच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी बारामतीचा गढ जिंकला देखील. आज त्यांचा वाढदिवस. सुप्रिया ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ताई

मला एका लहान भावासारखी प्रेमळपणाची वागणूक देणाऱ्या व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आदरणीय सुप्रियाताई सुळे आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच माता वैष्णोदेवी चरणी प्रार्थना. अशा शुभेच्छा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिल्या आहेत.

अभ्यासू मांडणीतून केंद्र सरकारला जाब विचारणाऱ्या ताई

बारामती लोकसभा मतदारसंघाचा संसदेतील बुलंद आवाज, राज्यातील प्रश्नांवर आपल्या अभ्यासू मांडणीतून केंद्र सरकारला जाब विचारणाऱ्या आणि निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष खासदार सुप्रियाताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जनतेची इमाने इतबारे सेवा करण्यासाठी आपणांस उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! अशा शुभेच्छांचा वर्षाव राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – Sudhir Mungantiwar 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss