“एक आमदार असणाऱ्याकडे 105 आमदार असणारा नेता जातो…” राज ठाकरे व फडणवीस यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला

विरोधकांकडून सातत्याने आता शिंदे व फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे.

“एक आमदार असणाऱ्याकडे 105 आमदार असणारा नेता जातो…” राज ठाकरे व फडणवीस यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला

मुंबई : विरोधकांकडून सातत्याने आता शिंदे व फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. अजूनही मंत्री मंडळाचा विस्तार नसणे, विविध निर्णय असो किंवा सध्याच्या महाराष्ट्रातील पूर परिस्थिती.अशा अनेक बाबींवर विरोधक हे राज्य सरकारवर टीका करत आहेत. त्यातच आज राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

पुण्यातील एका कार्यक्रमा दरम्यान सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या, “नवीन सरकार गोंधळलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान होतो. आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे बिचारे मुख्यमंत्री त्यांच्या मागे खूप मोठे षडयंत्र आहे.त्यामुळे त्यांची मला काळजी वाटते”. अशी भावना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रति मांडली.

हेही वाचा : 

‘कॉफी विथ करण शो’ मध्ये आर्यनच्या ड्रग्स प्रकरणावर बोलणार गौरी खान

त्याचबरोबर राज ठाकरे व फडणवीस यांच्या भेटीवर देखील सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले त्या म्हणाल्या, “दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तुत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेले त्याच्यातून काही होत नाही. ज्याच्याकडे एक आमदार आहे, त्याच्या घरी 105 आमदार असलेला नेता जातो. याचे काय करणार तुम्ही कोण कसा विचार करत हे मला माहित नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात जे काही सुरू आहे ते सर्वसामान्यांच्या हिताचे नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं सुरू आहे”. अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली.

देशातील ‘मंकिपॉक्स’चा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Exit mobile version