Sunday, July 7, 2024

Latest Posts

मतदारांनी चौथ्यांदा संधी दिली, आता जबाबदारी वाढली: Supriya Sule

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Constituency) पवार विरुद्ध पवार अश्या रंगलेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विजय मिळवला आहे. आज (शुक्रवार, ७ जून) पत्रकार परिषद घेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल (Loksabha Election 2024 Result) स्पष्ट झाला असून देशभरातुन एनडीए आघाडीला (NDA Alliance) बहुमत प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघांवर विजय मिळवला आहे. बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Constituency) पवार विरुद्ध पवार अश्या रंगलेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विजय मिळवला आहे. आज (शुक्रवार, ७ जून) पत्रकार परिषद घेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.

यावेळी त्या म्हणाल्या, “मी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार, कार्यकर्ते व मित्रपक्षांचे आभार मानते. एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही मोठी संधी दिली आहे. आता जबाबदारी वाढली आहे. आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अजून चार टॅंकरची सुरुवात आजपासून होत आहे. दुधाला, कांद्याला भाव नाही आहे, बेरोजगारी वाढते आहे, भ्रष्टाचार व महागाई खूप वाढली आहे त्यामुळे आज दुष्काळी दौरा करणार आहे. सरकारने दुधाचा भाव वाढवला नाही तर तीव्र आंदोलन करणार.”

पुढे त्या म्हणाल्या, “आज निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा बारामतीला आले त्यामुळे सकाळी मी आशा काकींचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर इथे राहणाऱ्या माझ्या बंधूंचा आशिर्वाद घेतला. घरातील सर्वांचा आशिर्वाद घेऊन मी नवीन जबाबदारी जी जनतेने दिली आहे त्या कामाला लागली आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “अजून विधानसभा उमेदवारीबाबत काही चर्चा सुरु झालेली नाही. कोण कुठल्या जागा लढणार हे पुढच्या महिन्याभरात समजेल. महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागली आहे. भाजपचे दोन खासदार सतत बोलत होते की आम्ही संविधान बदलणार आणि चॅनेलवरच बोलले आहेत. भाजप मित्रपक्षांशी कसं वागतात हे मी जवळून पाहिलं आहे.”

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून ३० जागा आपल्या नावे केल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाला (Shivsena UBT) ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला (NCP Sharad Pawar) ८ जागा जिंकता आल्या आहेत. महायुतीत भाजपला (BJP) ९ जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला (Shivsena) ७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (NCP) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

हे ही वाचा:

“INDIA आघाडीची ओळख घोटाळ्यांचीच” ; Pm Narendra Modi यांची विरोधकांवर घणाघाती टीका

PM Narendr Modi Live : “न हम हारे थे,न हम हारे हैं”; NDAच्या बैठकीत Pm Narendra Modi यांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss