spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुप्रिया सुळेंनी उडवली हिंदू जनआक्रोश मोर्च्याची खिल्ली म्हणाल्या, लव्हचा अर्थ मला कळतो पण जिहादचा माहित नाही

लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. लव्हचा अर्थ मला कळतो. जिहादचा अर्थ मला कळत नाही.

आज मुंबईतील दादर येतील शिवाजी पार्क येथे हिंदूंच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी सकल हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्च्यात देशात वाढणारी लव्ह जिहादची प्रकरणे थांबवता यावीत यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे. जनआक्रोश मोर्च्याच्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मोर्च्याची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या कि, “लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. लव्हचा अर्थ मला कळतो. जिहादचा अर्थ मला कळत नाही.”

तसेच जनआक्रोश मोर्च्यानंतर त्यांनी मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या मोर्च्याबद्दल म्हणजेच लिंगायत मोर्च्याबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ” एकतर हा मोर्चा सरकार विरोधात आहे. हे असंवेदनशील सरकार आहे, म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे.” यावेळी त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात धनुष्य बाणावरून सुरु असणाऱ्या वादावर देखील वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, “बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आहे. बाळासाहेबांनीच त्यांचा उत्तराधिकारी नेमला आहे. त्यामुळे ठाकरे गटालाच निवडणूक चिन्हं मिळायला हवं.”

तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पच्या मुद्द्यावरून बोलताना नारायण राणेंना देखील चांगलाच टोला लगावला आहे, “केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे हे बघावं लागेल. जूनमध्ये मंदी येणार आहे. असं नारायण राणे हे म्हणत आहेत. त्यामुळे त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे.” तसेच यावेळी सुप्रिया सुळे यांनी वंचित आणि शिवसेनेच्या आघाडीबद्दल बोलणे टाळले आणि वरिष्ठांनी यावर प्रतिक्रिया दिल्यावर आम्ही यावर वक्तव्य करणं योग्य दिसत नाही, असं त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

राहुल गांधींची चीनच्या राजदूताबरोबर बैठक… , एस जयशंकर यांनी केला चिनी घुसखोरीवर मोठा खुलासा

राशी भविष्य, २९ जानेवारी २०२३, जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss