spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Supriya Sule: जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करतयं; सुप्रिया सुळेंची जहरी टीका

"ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत आहे. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करत आहे. तसे जनरल डायर या देशात आले आणि त्यांनी ठरवले आहे.

“ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत आहे. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करत आहे. तसे जनरल डायर या देशात आले आणि त्यांनी ठरवले आहे. महाराष्ट्रचे तुकडे करायचे. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात कारभार सुरु आहे,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे या दौंड तालुक्यातील गावांच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील मळद गावात भेट दिली त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची मालिका थांबली पाहिजे. गडकरी साहेबांनी जवळपास १८ ते २० गोष्टी सुचवल्या त्याने ते बदल घडून आले होते आणि सहा महिन्यांमध्ये पहिल्यापेक्षा अपघात कमी झाले होते. गेल्या दोन चार दिवसात पुन्हा अपघात झाले. मी गडकरींना ट्विटरच्या माध्यमातून आणि त्यांच्या ऑफिसलाही संपर्क केला आहे. कलेक्टर प्रशासनाच्या सगळ्यांच्या संपर्कात आम्ही आहोत. तो शून्य आणि १०० टक्के सेफ्टीझोन हा झाला पाहिजे असा आग्रह असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. या सरकारने तीन काळे कायदे केले होते आणि ते निर्णय या सरकारला ते मागे घ्यावे लागले. तसेच कांद्याचा भावावरुन सरकर शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे. शेतकऱ्यांची वीज अमानुष पद्धतीने ही तोडली जाते ही अतिशय दुर्दैव आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कालपासून यांच्याविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिशा सॅलियन प्रकरणात गलिच्छ राजकारण सुरु केलं आहे. एखादं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे. ही महाराष्ट्रची संस्कृती नाही आहे. मात्र हे सातत्याने करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर जात आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. प्रतिनिधी किंवा नगरसेवक हा सगळ्यांच्या रोजच्या सुखदु:खात असतो. ही निवडणूक तातडीने घेतलीच पाहिजे, असं आमचं मत आहे. कारण आज सर्वसामान्य जनतेला प्रचंड अडचण होते. निवडणुकांबाबत झालेल्या सर्व्हेमध्ये राज्य सरकारला फारसं यश दिसत नाही आहे, असं सरकारच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे हे सरकार निवडणुकांपासून पळवाटा काढत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या मुलाचा हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल

Refinery Project : ठाकरे – फडणवीसांच्या चुकीनं राज्याचं होतयं रोज ५८ कोटींचं नुकसान

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss