spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंनी लगावला टोला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दि १९ जानेवारी रोजी मुंबई दौर्‍यावर येत आहेत. मोहनच्या या दौऱ्यावरून अनेकांकडून आरोप प्रत्यारोप हे सुरु आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर निशाणा साधला आहे .

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दि १९ जानेवारी रोजी मुंबई दौर्‍यावर येत आहेत. मोहनच्या या दौऱ्यावरून अनेकांकडून आरोप प्रत्यारोप हे सुरु आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर निशाणा साधला आहे . यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बिचारे पंतप्रधान नरेंद्र मोदीची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकापासून देशातील कोणत्याही निवडणुकासाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात असं म्हणत खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. तसेच प्रत्येक निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींशिवाय भाजपाकडे दुसरा नेता किंवा पर्याय नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्यांच आम्ही स्वागतच करतो. याआधी भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा,सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहे. मात्र आता यांच्या सर्वांसारखे नेते भाजपाकडे नाहीत. हे पाहून वाईट वाटत आहे. तसेच पुढे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यावर देखील निशाणा साधला आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा आणि ज्या प्लेनने आले ते पाहून खूप छान वाटले. त्या दौऱ्यातील जे फोटो माझ्या पाहण्यात आले त्या मधील काही उद्योजक हैदराबाद येथील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोसला जाण्याची गरजच नव्हती. ते उद्योजक हैदराबाद येथून मुंबईत आले असते आणि तिथे करार झाले असते. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यावर त्यांनी टीका केली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यात ८८ हजार ४२० कोटींचे करार झाला आहे.त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळतील अस म्हटलं जात आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सर्वाधिक उद्योग आले आहेत.अनेक आकडेवारी मधून समोर आले आहे.त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची विधान करणे योग्य नसून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे.हे लक्षात घेता,देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे कसे कमी होतील.याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.

हे ही वाचा:

Budget 2023 : बजेट म्हणजे नक्की काय ? समजून घ्या व्याख्या, इतिहास

पार्थ पवार शिंदे गटाच्या वाटेवर?, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची घेतली भेट

सत्यजित तांबेंच काँग्रीसमधून निलंबन, नाना पाटोळे यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss