सुप्रिया सुळे याचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात अनेक ठिकाणी गद्दार दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातही हा दिवस साजरा करण्यात आला.

सुप्रिया सुळे याचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात अनेक ठिकाणी गद्दार दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातही हा दिवस साजरा करण्यात आला. आज २० जून म्हणजे गद्दार दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्या घटना घडल्या. त्या घटनेला टीव्हीवर ‘गद्दार दिवस’ म्हणत आहेत, हे पाहिले. परंतु माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केली असं काहीजण म्हणत आहेत तर त्याच उध्दव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते हे विसरले का? असा टोलाही खासदार सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे देखील यात सहभागी झाल्या होत्या. या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा इशारा सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या, शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे बोलायला इतके पक्के आहेत की, त्यांनी कॅमेर्‍यासमोर ‘५० खोके’ तुम्हाला हवेत का… अशी ऑफर दिली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सांगितले पाहिजे की, तुमच्या सरकारमधील मंत्रिमंडळातील मंत्री भ्रष्टाचाराची ऑफर देतात. मोदीजी तुम्ही बोलला होतात ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ याची आठवणही सुप्रिया सुळे यांनी करुन दिली. मग तुमच्या सरकारमध्ये असे कसे घडले असा सवाल देखील सुप्रिया सुळे यान विचारला आहे. तसेच तुमच्या सरकारला जनतेकडून खॆ सरकार म्हंटलं जात आहे यांची देखील आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली.

दरम्यान, ‘महाराष्ट्र ना कभी झुका है, ना कभी झुकेगा…’, ‘मोडेन पण वाकणार नाही’ जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं. त्या म्हणाल्या, आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. गद्दारांना गद्दार म्हटल्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकणार असाल, तुमच्यात हिंमत असेल तर आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाका. मग आम्ही जेलभरो आंदोलन करू. असे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले.

हे ही वाचा:

बच्चू कडू शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले…

INTERNATIONAL YOGA DAY 2023, योग दिवस साजरा करताना या शुभेच्छांचा करा वापर.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version