spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आनंदाच्या शिधा वाटपावरुन सुप्रिया सुळेंची शिंदे- फडणवीस सरकारला टोला

रेशनकार्ड (Rationcard) धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी शिंदे सरकाकरने आंनदाचा शिधा या योजनेची घोषणा केली. मात्र दिवाळी तोंडावर आली तरी हा आनंदाचा शिधा गरीबांपर्यंत पोहोचला नाहीये, असा आरोप विरोधी पक्षा कडून करण्यात येत आहे. गरीबांना दिवाळीत दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने १०० रुपयात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर पाम तेल यांचं किट रेशन दुकानात देण्याचा निर्णय घेतला. या वस्तूंना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) म्हटलं जातंय. मात्र त्याच्या वाटपात अडथळे येत असल्याचं चित्र आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे. त्या पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये बोलत होत्या. राज्य सरकारने सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी १०० रुपयांमध्ये शिधा वाटपाची योजना आखली होती मात्र दिवाळी तोंडावर आली तरीही शिधा अजून काही ठिकाणी पोहचला नाही त्यावरुन सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, असे उपक्रम जबाबदारीने राबवा. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा हा कॅज्युअल अप्रोच आहे. काहीतरी घाईघाईत अर्धवट करण्याचा प्रयत्न केला आहे. गरीबांसाठी जे कराल ते मनापासून करा. फोटो मध्ये अडकू नका, अशी माझी विनंती आहे. सेवा ही महत्त्वाची असते. फोटो हा महत्त्वाचा नसतो, असाही टोला सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामन्यांचे घेणं-देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

सुप्रिया सुळेंनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. राऊतवाडी या ठिकाणी हरणी ते मुरती या रस्त्याचे भूमिपूजन केलं. गेल्या काही दिवसांत पाऊस झाला. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट कर्ज माफी करावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर कुणीही जात नाही. शेतकरी किती अडचणीत आहेत, हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर कळेल. महाराष्ट्र सरकारने हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेने ऑफिसमध्ये न बसता बांधावर गेले पाहिजे. शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

हे ही वाचा :

ब्रिटनमध्ये पुन्हा सत्तानाट्य; आता ‘हे’ बनू शतकतात ब्रिटनचे पंतप्रधान

राज्य सरकारचे नवीन धोरण ५ जी तंत्रज्ञानासाठी फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss