spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुप्रिया सुळेंच्या साडीला लागली आग

आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासोबतचा मोठा अनर्थ टळला आहे. सुप्रिया सुळे पुण्यामध्ये (Pune) असताना एका कार्यक्रमादरम्यान यांच्या साडीला अचानक आग (Sari caught fire suddenly) लागली. आजू बाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी ती आग वीजवळी. सुदैवानं यामध्ये त्यांना कोणताही इजा झालेली नाही. सुप्रिया कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन (Lighting the lamp) करत असतांना त्यांच्या साडीला आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील हिंजवडी (Hinjewadi in Pune) भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेस (Karate coaching classes) उद्घाटन सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी दीपप्रज्वलित त्यांनी केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुळे यांनी आग विजवली. दैव बलवत्तर सुळे यांना कोणतीही हानी झालेली नाही.

यावेळी सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या साडीच्या पदराचा (A layer of saree) काही भाग जळाला आहे. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली आणि सर्वच जण घाबरून गेले. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर सुप्रिया सुळे या पुढील कार्यक्रमाला गेल्या आहेत. सुप्रिया सुळे या आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात अनेक कार्यक्रमांना त्या हजेरी लावणार आहेत. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी (Hinjewadi) येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली.आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार.

हे ही वाचा:

गोपीचंद पडळकरांनी पदवीधर मतदानावर केली भीती व्यक्त

Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आणि शनी देवांची विशेष कृपा, पूजेच्या विधी घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss