राज्यामधील गद्दार सरकारची लवकरच अनिव्हर्सरी, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

राज्यामध्ये लवकरच गद्दार सरकारची अनिव्हर्सरी आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले तर सांभाळून राहा अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

राज्यामधील गद्दार सरकारची लवकरच अनिव्हर्सरी, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

राज्यामध्ये लवकरच गद्दार सरकारची अनिव्हर्सरी आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले तर सांभाळून राहा अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका करत अनेक शब्दांचे ताशेरे ओढले आहेत. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की रॅडिसन हॉटेलमध्ये राहण्याचे निमंत्रण दिले तर सांभाळून रहा आणि विचार करा. गद्दारांना खासगी हॉटेल लागेल त्याचबरोबर प्रायव्हेट विमान सुद्धा लागेल. गद्दारी करताना कोणालाही, असे वाटले नाही की आपल्या मतदारसंघात जावे, लोकांना विचारावे. गावभेटी घ्याव्यात, लोकांना सांगावे हा मी निर्णय घेतोय. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल का? असे एखाद्याने विचारलं नाही.” “तुम्ही पक्ष बदलत आहात. विचारधारा बदलता, सरकार पाडता. लोकांना विश्वासात घ्यावे असे का वाटले नाही?, तिकडे गुवाहाटीमध्ये एकमेकांना मिठ्या मारता, शॉर्ट कपडे घालता, तुम्ही सुट्टीला गेला होता की देशाच्या सेवेसाठी गेला होता?” असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत. भारतीय जनता पक्षाने सांगितले आहे की तुमचे पाच मंत्री काढून टाका. मी विचार करते काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष सत्तेत होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना सांगू शकत नाहीत की कोणी कोणाला मंत्री करायचे. काँग्रेस पक्षाने त्याचे मंत्री करायचे आणि बाकी पक्षाने त्यांचे मंत्री करायचे उद्धव ठाकरे म्हणायचे की हे मिंधे सरकार आहे आता मला ते पटू लागले आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने गद्दारी केली यामध्ये काही वाद नाही. बाळासाहेबांनी ठाकरेंनी पक्ष स्थापन केला आणि या पक्षामध्ये असताना उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली. त्यामुळे तो पक्ष कोणाला घायचा अधिकार नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्यामधील सरकार आणि केंद्र सरकार सातत्याने सगळी धोरणे नेहमी शेतकऱ्याच्या विरोधामध्ये राहिले आहेत. त्याचबरोबर दुधाचे भाव पडले आहेत कांदा असेल किंवा टोमॅटो असेल यामध्ये कशालाही भाव नाही असे अनेक आरोप सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत.

हे ही वाचा:

लवकरच गाड्यांचा वेग वाढणार, Nitin Gadkari यांनी दिली माहिती!

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

तुम्ही Dahi Toast कधी ट्राय केला आहे का? नसेल तर ही लज्जतदार रेसिपी फक्त तुमच्या साठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version