spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितीश कुमार उभ्या जन्मात पंतप्रधान होणार नाही ; मोदींचा टोला

सुशील कुमार मोदी यांनी म्हटले, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर आता जेडियूमुक्त झाले आहे.

बिहारमध्ये भाजपासोबतची युती तुटल्यानंतर मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे आमदार सरकारला असलेला पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात राज्यातील जेडीयूच्या ६ पैकी पाच आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ६ पैकी ५ आमदारांनी पक्ष सोडल्याने हा नितीश कुमार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभेच्या सचिवांनी या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करून विधानसभेच्या सर्व सदस्यांना याची माहिती दिली आहे. नोटिफिकेशनमध्ये सांगितले की, भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या शेड्युल अन्वये हे पाच आमदार आता भाजपाचे सदस्य असतील.

नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वत:ला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असे त्यांनी म्हटले. पण बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपचे खासदार सुशील मोदी यांनी नितेश कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सुशील कुमार मोदी यांनी म्हटले, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर आता जेडियूमुक्त झाले आहे. त्यानंतर बिहारमध्ये आता लालूप्रसाद यादव हे जेडियूत फूट पाडणार आहेत आणि बिहार जेडियूमुक्त करणार आहेत. असे सुशील मोदी यांनी म्हटले. पुढे म्हटले जेडीयूचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांचे आमदार कमजोर आहेत का ? की त्यांना विकत घेतले जाईल. जर असतील तर त्यांनी आत्मपरीक्षण करावे. मणिपूर मधील जेडियुच्या आमदारांनी स्वतःहून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे हे पंतप्रधान कधीही होऊ शकत नाही, उभ्या जन्मात त्यांना हे शक्य नाही अशी खोचक टीका सुशीलकुमार मोदी यांनी केली.

हे ही वाचा:

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

मोठी बातमी! वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss