spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुषमा अंधारेंनी मागितली वारकऱ्यांची माफी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. सुषमा अंधारेंवर सध्या पक्षाने प्रबोधन यात्रेची जबाबदारी देण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्यावर नंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मी कुणाच्याही श्रद्धे आड आले नाही. पण तरीही राजकीय सूडबुद्धीतूनच मला विरोध केला जात आहे. मला विरोध करण्यामागे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत, असं सांगतानाच तरीही जर माझ्यामुळे संतांच्या, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, असं म्हणत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन ही माफी मागितली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, मी संत ज्ञानेश्वरांबद्दल काहीही वावगे बोलले नाही. माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी ते विधान केलं होतं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. त्यांना माऊली म्हटलं गेलं. माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या आईने १५ एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं. ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असली पाहिजे, असं मी म्हटलं होतं. पण ते विधान कापलं गेलं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. २०१९-२०२०मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वात पुढे ह.भ.प. गणेश शेटे हेच होते. तेच आता मला विरोध करत आहेत. आचार्य तुषार भोसले यांचाच हा कंपू आहे. जे लोक वारीत कधीच पायी चालले नव्हते, त्या लोकांनी लोकांचं आरोग्य लक्षात न घेता केवळ स्टंट केला होता, अशी टीका त्यांनी केली.

सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झल्याच दिसून आलं. आळंदी येथील वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत त्यांना चपलेचा हार घालत निषेध केला. आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. सुषमा अंधारेंच्या प्रतिमेस चपलांचा हार घालत वारकऱ्यांकडून त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यात आलं. संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा असा सल्लाही वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंन दिला आहे, तसेच वारकरी संप्रदाय हा जातपात न मानणारा असून साधुसंतांनी समानतेचा आणि एकीचा पाया रचल्याचं देखील वारकरी संप्रदायाच्या अनुयायांचं म्हणणं आहे.

हे ही वाचा : 

Vijay Sethupathi तामिळ सुपरस्टार विजय सेतुपतीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले आश्चर्यचकित

दादरमधील सिद्धिविनायक मंदिर राहणार ५ दिवस बंद

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss