spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत पाटलांकडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मनधरणी

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा फुले (Mahatma Phule) आणि कर्मवीर भाऊराव (Karmaveer Bhaurao Patil) पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे (controversial statement) राज्यभरात पडसाद उमटले. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही त्यांच्यावर काल पिंपरीत शाईफेक करण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. असं सगळं घडलं असताना इकडे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वेगळा दावा केलाय. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आपली मनधरणी सुरु असल्याची माहिती सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिलीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) चरित्र साधने प्रकाशन संस्थेच्या सदस्य पदाचा राजीनामा मागे घ्या. दोन घटना वेगवेगळ्या आहेत. मी संस्थेच्या कामाविषयी काही बोललो नाही. आपण राजीनामा मागे घ्या, अशी चंद्रकांत पाटलांनी विनंती केल्याची माहिती सुषमा अंधारेंची दिली. “काल जी घटना घडली ती निषेधार्थ आहे. मी माझी शाई कुठे वापरावी हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. मात्र भाजपचेच नेते सातत्याने का अशी वक्तव्य करतायेत?”, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari), भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) , मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) जे बोलले त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शब्दही काढला नाही. मात्र जे चुकलंय ते चुकलं तरी म्हणा”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. “मी १३ डिसेंबरच्या पुणे बंदमध्ये सहभागी होणार आहे”, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

हे ही वाचा : 

छगन भुजबळांच्या प्रश्नाला चंद्रकांत पाटलांचं प्रतिउत्तर

चंद्रकांत पाटलांच्या समर्थनासाठी पुण्यात भाजपा रस्त्यावर

हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss