सुषमा अंधारे यांच्यापाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोस्ट सर्वत्र वायरल

सुषमा अंधारे यांच्यापाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोस्ट सर्वत्र वायरल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांच्याकडे प्रबोधन यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर सुषमा अंधारेंकडून प्रबोधन यात्रेमधून शिंदे गटावर, भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) आणि मनसेला (MNS) लक्ष केलं आहे. दरम्यान, अंधारे यांच्या पाठीमागे केवळ शिवसेनाच नाही तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारीदेखील उभे आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याची (police officer) फेसबुक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात व्हायरल होताना दिसत आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ही पोस्ट लिहिली आहे. सुषमा अंधारे यांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर (Facebook page) शेअर केली असून सुरेश खोपडे यांची ही पोस्ट अत्यंत ऊर्जादायी असल्याचं म्हटलं आहे. माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे (Suresh Khopde) यांनी पोस्टमधून भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच सुषमा अंधारे यांची पाठराखण केली आहे. तसेच सुषमा अंधारे यांना दिल्या गेलेल्या धमक्याबाबत देवेंद्र अजूनही अभ्यासच करत आहेत काय? यात गृहमंत्री (Home Minister) ही उघडे पडले. देवेंद्रजी, कायद्याचा अभ्यास लवकर पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही येणार आहोत, असा इशाराच सुरेश खोपडे यांनी दिला आहे.

काय आहे सुरेश खोपडे यांची पोस्ट.

सकाळी सकाळी अंकूश काकडे काका यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर यांची ही अत्यंत ऊर्जादायी पोस्ट पाठवली ….

सुषमा अंधारे यांच्या जाळ्यात कोण कोण अडकले?

आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही असे जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि मंडळींचे हिंदुत्व उघडेनागडे करून दाखविले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले गेले. सुषमाताईंनी संयतपणे विरोधकांना प्रश्न विचारून राजकीय दृष्ट्या नामोहरण केले.

त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. बचाव करता येत नाही म्हणून त्यांनी ज्याना जाणवे व शेंडीच्या पलिकडचा हिंदू धर्म माहीत नाही त्या तथाकथित वारकऱ्यांना पुढे केले. त्यात नकली वारकऱ्यांचा दर्जा दिसून आला. तात्पर्य एका महिलेने तीन-चार महिन्यात फेकलेल्या जाळ्यात एवढे मासे अडकले.

ती क्लिप दहा-बारा वर्षांपूर्वीची असताना ती पुन्हा दाखवली गेली आणि त्यावर तथाकथित वारकरी महिला व पुरुषांनी सुषमा अंधारे यांना वारकऱ्यांना न शोभणारी भाषा वापरली. एवढेच नव्हे तर हल्ला करण्याची फाडून टाकण्याची भाषा केली. हे सगळे देवेंद्र फडणवीस यांचे भाडोत्री सैनिक दिसतात.

राजकारण्यावर शाई फेकली तर खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे देवेंद्र फडणवीस दाखल करतात. मग सुषमा अंधारे यांना दिल्या गेलेल्या धमक्याबाबत देवेंद्र अजूनही अभ्यासच करत आहेत काय? यात गृहमंत्री ही उघडे पडले. देवेंद्रजी कायद्याचा अभ्यास लवकर पूर्ण करा नाहीतर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही येणार आहोत.

सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालू आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. पक्ष असो अगर नसो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत!

अशा मांडणीतूनच समाज व्यवस्थेची रचना आधुनिकतेकडे आणि घटनेवरील आधारित मूल्यावर पुढे नेता येईल. सिव्हिल सोसायटी म्हणून ते आपणा सर्वांचे एक कर्तव्यच आहे.

हे ही वाचा : 

अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणामुळे कोर्टाने पाठवली नोटीस

Watch Video, चक्क हरणांचा कळप विमानाला घेऊन आकाशात उडाला!

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version