सुषमा अंधारेंनी केला मोठा गौप्यस्फोट, माझा घात-अपघात होऊ शकतो

काल दि. ५ जानेवारी रोजी ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे या चंद्रपुरात होत्या. चंद्रपुरात काही सामाजिक संघटनांनी एकत्र एक एका व्याख्यानाचे आयोजन हे केले होते.

सुषमा अंधारेंनी केला मोठा गौप्यस्फोट, माझा घात-अपघात होऊ शकतो

काल दि. ५ जानेवारी रोजी ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या चंद्रपुरात होत्या. चंद्रपुरात काही सामाजिक संघटनांनी एकत्र एक एका व्याख्यानाचे आयोजन हे केले होते. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर व्याख्यान केले होते. चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात हा सर्व कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सुषमा अंधारे यांनी एक गौप्यस्फोट हा केला आहे. त्यावेळी आपल्याला अधिकाऱ्यानं तुमचा घात-अपघात होऊ शकतो, असं सांगितल्याचं त्या म्हणाल्या.

याभाषणात बोलताना सुषमा अंधारे यांनी महापुरुषांवर सुरु असलेल्या राजकारणावर प्रखर भाष्य केले आहे. तसेच त्या एक मोठा आरोप करत म्हणाल्या आहेत कि, वर्तमान सरकार महापुरुषांच्या यादीत काही लोकांना घुसवण्याचं काम करतंय. महापुरुषांची अवमानना होते मात्र सरकारी यंत्रणा काहीही करत नाही, ठप्प राहते आणि हे जाणीव पूर्वक केलं जातं. जाणीवपूर्वक महापुरुषांचं प्रतिमा भंजन केलं जातं आहे. सरकारला बहुजनांच्या आणि पुरोगामी विचारांच्या महापुरुषांची ओळख पुसून टाकायची आहे आणि हेडगेवार-गोळवलकर यांना लोकांच्या मनात ठसवायचं आहे असा घणाघात त्यांनी केला. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माझा घात-अपघात होऊ शकतो असं म्हणत भीती देखील व्यक्त केली आहे. तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने तुमचा अपघात होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचं सांगत सुषमा अंधारे यांनी गौप्यस्फोट केला.

तसेच त्या पुढे म्हणल्या आहेत कि, उर्फी जावेदच्या कपड्यांवर ३-३ दिवस चर्चा होते असते , मात्र बायकांचे कपडे उतरवणाऱ्यांची चर्चा होत नाही. त्यांनी लोकांना जाणीवपूर्वक खऱ्या मुद्द्यांपासून लांब नेलं जात आहे असं देखील सुषमा आधारे म्हणाल्या आहेत. लोकांच्या बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या मुद्द्यांना बगल दिली जात आहे. धर्मरक्षक की स्वराज्य रक्षक या सारखे मुद्दे उपस्थित करून लोकांचं ब्रेनवॉश केलं जातं आहे, अदानी आणि अंबानी यांनी दिलेला दीड जीबी डाटा लोकांना नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

हे ही वाचा:

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का, तब्ब्ल ५० पदाधिकारी शिंदे गटात

Covid 19, चीनमध्ये वाढतोय कोरोनाचा उद्रेक, भारतातील स्थिती घ्या जाणून

पत्रकार दिनानिमित्त जाणून घ्या कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी महाराष्ट्राला दिले पहिले वृत्तपत्र?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version