सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेच्या बंगल्यावरून किरीट सोमय्यांना केला प्रश्न

सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेच्या बंगल्यावरून किरीट सोमय्यांना केला प्रश्न

एकीकडे राज्यात अनेक मुद्यावरून राजकारण सुरू असतानाच दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढताना दिसून येत आहेत. किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षात नवीन लोकांचे घोटाळे बाहेर काढू असं आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन सांगितलं होतं. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरतीही गंभीर आरोप केले आहेत.

कोर्लई येथे रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे १९ बंगले (19 bungalows) होते. मात्र, आता हे बंगले आता गायब आहेत, याची चौकशी करावी (should inquire), अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याच गोष्टींवरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. यासंबधी बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असते. ते फार आरंभशूर आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचे काहीच होत नाही. राहिला प्रश्न त्या १९ बंगल्याचा, जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे असं अंधारे म्हणाल्या आहेत.

सह्याद्री (Sahyadri), नंदनवन, रामटेक (Ramtech), वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीटभाऊंनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी, असा खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

हे ही वाचा : 

Exclusive : महाराष्टातील सर्वात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस यांना नवं वर्ष कसं जाणार ? पंडित राजकुमार शर्मा म्हणाले…

‘अम्मा तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात’ शिझान खानच्या आईसाठीची तुनीषा शर्माची व्हॉइस नोट होतेय व्हायरल

अजित पवार यांना धरणवीर पुरस्कार द्या, भाजपाची मागणी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version