Thursday, July 4, 2024

Latest Posts

Chandrakant Patil तुमच्या चॉकलेटने आम्ही प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका: Sushma Andhare

शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपल्या प्रतिक्रिया देत, "तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका," असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session 2024) आजपासून (गुरुवार, २७ जून) सुरुवात झाली आहे. अश्यातच भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विधानभवनात (Maharashtra Vidhan Bhavan) भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिले यावरून आता शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपल्या प्रतिक्रिया देत, “तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका,” असा इशारा दिला आहे.

सुषमा अंधारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट सुद्धा पचवून आम्ही परत उभे राहिलो आहे. माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची विनंती आहे की जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका. तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका. मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काहीही परिणाम होणार नाही. कुठली चर्चा झाली नाही, आम्ही कुणासोबत जाणार नाही.”

उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) यांनी आज विधान भवन येथे लिफ्टमधून एकत्रित प्रवास केला. यावरून राज्यात पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार असल्याच्या चर्चाना उधाण आले. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुल्ली मारली आहे. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही, त्यामुळे एकाच लिफ्ट मधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आल्याचा होत नाही,” असे त्या म्हणाल्या.

मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर टीका करत त्या म्हणाल्या, “आज शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने विधानभवन पुणे येथे आंदोलन करत आहोत. पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जात, पण आता याच पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडाला आहे. पब बारच्या संस्कृतीने सगळ्या तरुणाईला विळखा टाकलेला आहे. पुण्यात फक्त अधिकृत २३ पब बार आहेत. मग बाकीचे १०० पब बार कोणाच्या आशीर्वादने चालतात? शंभूराजे देसाई तुमच्या धमकीला मी घाबरत नाही. तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू… कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात? आम्ही मागील १० महिन्यांपासून ड्रग्जच्या विरोधात आवाज उठवतोय. मग कारवाई का होत नाही? पुण्यातील पब बार माहिती आमच्याकडे आहे. शंभूराजे देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता? चरणसिंग राजपूत या भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्याचे निलंबन करून चौकशी झालीच पाहिजे. शंभूराजे देसाई तुमच्या अधिकाऱ्यामुळे पुण्याची ओळख अंमली पदार्थ अशी होत आहे. तुम्ही नाही कारवाई केली, तर आम्हांला रस्त्यावर उतरायला लागेल. आमच्या सहनशक्तीचा अंत नका पाहू. आम्ही या सगळ्यांबाबत आंदोलन करत आहोत. पुण्यात कार अपघात प्रकरण नाही तर राज्यातील इतर प्रश्नही अधिवेशन काळात ठोस भूमिका घेतल्या जातील. अजून कसले पुरावे देत आहे आता तर २३ पब बार बाबत माहिती दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्याचं वाटोळं केलं आहे… चरणसिंग राजपूत आणि शंभूराजे देसाई यांच मला नातं कळेना,” असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Monsoon Session मध्ये कोणाची उपस्थिती? काय घडलं खास?

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss