spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Amit Shah यांना Uddhav Thackeray यांचं नाव घेतल्याशिवाय.., Sushma Andhare यांचा जोरदार हल्लाबोल

पुणे येथे काल (रविवार, २१ जुलै) भाजप कार्यकारिणीची बैठक (BJP Meeting) पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी, त्यांनी उपस्थित भाजप (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत, “उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत,” असे वक्तव्य केले आहे. यावरून आता शिवसेना उबाठा गट (Shivsena UBT) चांगलाच आक्रमक झाला असून सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत , “अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही,” अश्या शब्दांत टीका केली आहे.

अमित शाह यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर सुषमा अंधारे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “अमित शाह यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळे उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्कीच स्पष्ट झाले. त्यातला पहिला भाग म्हणजे आजही अमित शहा याना यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे.”

“ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केले की पार्लमेंट मध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश पिठोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतमस्तर अमित शाह तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे,” असे त्या यावेळी म्हणाल्या.

काय म्हणाले होते अमित शाह?

अमित शाह यांनी यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली. यावेळी ते म्हणाले, “या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत संबंधित आहे, पीएफआयला पाठिंबा देणाऱ्या आणि औरंगाबादचे संभाजी नगर असे नामकरण करण्याच्या विरोधात असणाऱ्यांच्या सोबत ते उभे आहेत. हा औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करू शकतो. महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आल्यावर आम्ही मराठा आरक्षण आणू. जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्हाला मराठा आरक्षण मिळाले. मराठा आरक्षण चालू ठेवायचे असेल तर भाजपला विजयी करा!” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

मराठ्यांचा कचका कसा असतो, तुला दाखवतो: Manoj Jarange Patil यांचा Pravin Darekar यांना इशारा

आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठीच चित्रपट, Dharmaveer 2 वरून Sanjay Raut यांची CM Eknath Shinde यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss