सुषमा अंधारे भेटणार ‘या’ शिंदे गटाच्या आमदारला

सुषमा अंधारे भेटणार ‘या’ शिंदे गटाच्या आमदारला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे सध्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या बनल्या आहेत. जेव्हा पासून सुषमा अंधारेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे तेव्हा त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आज पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली आहे. मी आरोप करत नाही, मी टीका करत नाही. परंतु जर एक कुटुंब आहे, तर कुटुंबामध्ये काय केलं, काय नाही केलं आणि काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार बहिणीला असतो. सुहास कांदे भाऊ आहेत. म्हणून बहीण म्हणून त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितले.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नाशिकमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नाशिक, मालेगाव, नांदगाव या भागामध्ये महाप्रबोधनच्या सभा होणार आहेत. कारण या भागात दादा भुसे, सुहास भाऊ, हेमंत गोडसे हे सगळे भाऊ आहेत. या सगळ्या भावांना भेटणार आहे. कुटुंबात काय चुकलं हे विचारणार आहे. मात्र भावांचे संस्कार किती बिघडून गेलेत हे पण बघत आहोत. एकेकाळी शिवरायांचा बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आमचे भाऊ आता भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला गेल्यानंतर त्यांचा स्वभाव बदललेला आहे आणि महिलांना हीन लेखण्याचा जो भाजपचा दृष्टिकोन आहे, तोच यांच्या अंगात किती भिनलेला आहे तेही दिसते आहे, असा टीकाही त्यांनी यावेळी केली.

पुढे सुषमा अंधारे यांनी निलेश राणे आणि नितीश राणे यांच्यावर सुद्धा जोडणे टीका केली आहे. “नितू आणि निलू हे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यांचा अभ्यास कमी आहे, कारण नारायण राणेंनी त्यांना संस्कार दिले नाहीत. नितेश राणेंनी ट्विट केलेला व्हिडीओ २० वर्षापूर्वीचा आहे. कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने त्यांची कानशिल लाल झाली आहे. त्यामुळे त्याचं अस्थिर होणं स्वाभाविक आहे,” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.

हे ही वाचा : 

जी२० परिषदेमध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना सहभागी होण्याचं केलं आव्हान

अमिताभ बच्चन यांच्या आठवणीतले विक्रम गोखलेंची, ‘ते आमच्या आयुष्यात आले, त्यांची भूमिका बजावली आणि निघून गेले’

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version