सुषमा अंधारेंचे राज्य सरकारवर आरोप

सध्या अनेक राजकीय घराण्यांवर ईडीचे छापे सुरु आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले आहेत.

सुषमा अंधारेंचे राज्य सरकारवर आरोप

सध्या अनेक राजकीय घराण्यांवर ईडीचे छापे सुरु आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, गिरीश महाजनांना सांगते, मी हवेत बोलत नाही, तुम्ही जिल्हा सांगायचा, मी त्या जिल्ह्यातील एपिसोड सांगेन, तुमची इच्छा मी पूर्ण करेन. शिंदे गटातील लोकांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी भाजपाचीच लोक कसं काम करतात हे स्टिंगमधून पुढे आणू शकते. माझ्याकडे अनेक एपिसोड आहे. सध्या जळगावचा एपिसोड आणला, पुढील एपिसोड मागाठणे विधानसभेचे आहे. तिथे कुणाची संपत्ती आहे ते पाहून घ्या. १०० कोटींचा घोटाळा, गोरगरिबांच्या तोंडातून घास काढण्याचा हा प्रकार आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, गरिबांच्या नावावर १०० कोटी रुपये लुटावे ही गंभीर बाब आहे. मध्यान्ह भोजनाचे कंत्राट मिळालेल्या ३ कंपन्यांची चौकशी करण्यात यावी. भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे माझ्याकडे आली आहे. मागाठणे, नवी मुंबई, धाराशिव, जळगाव असे विविध एपिसोड आहेत. आम्ही स्वत:ची शिकार स्वत: करतो, मेलेल्या शिकारीवर झडप मारणाऱ्यांपैकी नाही. माझ्याकडे मोठा गठ्ठा आहे. त्यात अनेक लोकांच्या कुंडल्या आहेत. एपिसोडमध्ये हे सर्व दाखवले जाईल. भाजपाच्याच लोकांनी कुठून कशी कागदपत्रे पाठवली आहेत ते मी ऑनकॅमेरा गिरीश महाजनांना माहिती असावे म्हणून सांगितले असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपा नेत्यांनी दिलेल्या कागदपत्रावर आम्ही काम करत नाही. आमच्याकडे टीम आहे. पडताळणी करून आम्ही बोलतोय. एकनाथ खडसेंनी मिड डे मिलबाबत अधिवेशनात मुद्दा मांडला. राज्य सरकारकडून मध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. त्यातून बांधकाम कामगारांना दुपारचे जेवण दिले जाते. माझ्याकडे जळगाव जिल्ह्याची माहिती आहे. २० फेब्रुवारी २०२३ ला गायत्री सोनावणे यांनी अटल योजनेतंर्गत किती लाभार्थ्यांना भोजन देता याची माहिती मागवली. त्यावर ३५-४० हजार आकडा विभागाने सांगितला. ९ मार्चला अशी कोणती संस्था आहे. ज्यांच्याकडून टेडर मागवली आणि त्यांची किती बिले दिली याची माहिती मागवली. यावर ३० मे २०२३ रोजी उत्तर देताना मार्चपर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता

India vs West Indies चा दुसरा कसोटी सामना अनिर्णित

अखेर Devendra Fadnavis म्हणाले, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version