spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीचा शिंदेच्या शिवसेनेला रामराम

Sushama Andhare Husband : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगवेगळी समीकरण पाहायला मिळाली. अशातच उद्धव ठाकरे यांच्या संकट काळात सुषमा अंधारे यांनी आधाररूपी त्यांना साथ दिली. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजू जनतेपर्यंत नेल्या.

Sushama Andhare Husband : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगवेगळी समीकरण पाहायला मिळाली. अशातच उद्धव ठाकरे यांच्या संकट काळात सुषमा अंधारे यांनी आधाररूपी त्यांना साथ दिली. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजू जनतेपर्यंत नेल्या. महा प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्हे पिंजून काढण्याचे काम त्यांनी केले. शिवसेनेत सुषमा अंधारे नावारूपाला आल्यानंतर काही दिवसातच अंधारे यांचे विभक्त पती अँड वैजनाथ वाघमारे त्यांनी सिद्धांच्या शिवसेनेत प्रवेश केला. वाघमारे यांच्या या पक्षप्रवेशाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी अँड वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांना थेट आवाहन दिले होते. सुषमा अंधारे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं वाघमारे यावेळी म्हटले होते. सोबतच आपण लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याच यावेळी वाघमारे म्हंटले होते.

ॲड. वैजनाथ वाघमारे यांच्या पक्षप्रवेशानंतर याविषयी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. कोण कोणत्या गटात जातो, याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. सुषमा अंधारे यांना डिवचण्यासाठीचं त्यांच्या विभक्त पतींना शिंदेनीं आपल्या पक्षात घेतला असल्याच राजकीय वर्तुळात म्हटलं जात होतं. परंतु आता एवढा काळ होऊनही अद्याप पक्षाकडून कोणतीच महत्वाची जबाबदारी दिली जात नसल्याने वाघमारे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा राजीनामा अद्याप तरी मंजूर झला नसून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

हे ही वाचा : 

अमित शाह यांचा महाराष्ट्रातला दुसरा दौरा ; एकनाथ शिंदे जाणार स्वागतासाठी

अजितदादा भावी मुख्यमंत्री झळकले मुंबईत बॅनर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss