ससून ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे (dada bhuse) यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे,

ससून ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे  यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यासोबतच या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असंही त्या म्हणाल्या आहेत.

मंत्रीपदावर असताना कोणत्याही प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही, त्यासाठी त्यांनी मंत्रीपदावरुन पायउतार झाला पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी चौकशी केली पाहिजे. त्यानुसार दादा भुसेंना मंत्रीपदावरुन पायउतार करावं लागेल आणि नंतरच या ड्रग्ज प्रकरणी त्यांनी चौकशी करावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही अनेक गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत. यात आम्हाला राजकरण आणायचं नाही.

ललित पाटील याच्यावर काय उपचार सुरू होते याची माहिती द्या. गृहमंत्री आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली ओपन करावी हे आम्हाला माहिती आहे. देशाच्या सुरक्षेच्या संबंधित माहिती सांगता येत नाही, ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे सांगू नका. पण उपचार काय सूरू होते हे तरी सांगा असं त्या म्हणाल्या आहेत.

जीव ठाकूरांची नार्को टेस्ट करा…संजीव ठाकूर यांचं निलंबन करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतरच या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे समोर येतील. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा अन्यथा या सगळ्या प्रकरणी महविकास आघाडी २४१ तारखेला रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. २४ तारखेनंतर संजीव ठाकूर यांना आम्ही कामं करु देणार नाही, असंही त्यांनी सरकारला खडसावलं आहे.

हे ही वाचा: 

अजितदादा मुख्यमंत्री होणार ही न घडणारी गोष्ट- शरद पवार

नवरात्रीच्या उपवासात बनवून पाहा राजगिरा हलवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version