नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर सुषमा अंधारेंची ट्विटद्व्यारे प्रतिक्रिया

शिवसेनेच्या बंडानंतर राजकारणामधील अनेक समीकरणे बदलली आहेत. अनेक ठाकरे गटातील नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत.

नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर सुषमा अंधारेंची ट्विटद्व्यारे प्रतिक्रिया

शिवसेनेच्या बंडानंतर राजकारणामधील अनेक समीकरणे बदलली आहेत. अनेक ठाकरे गटातील नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढत आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती. ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे.

ट्विटद्वारे सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं असून यामुळं सध्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अंधारे यांनी ट्विटद्वारे खोचक टीका करताना म्हटलं की, “तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापतीपद भूषवणाऱ्या पुरोगामी नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्य मंत्री पदासाठी अॅडव्हान्समध्ये अभिनंदन…!!” असे सुषमा अंधारे यांनी ट्विट केले आहे.

शिवसेनेच्या बंडानंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर प्रवेशावेळीच उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनतर त्यांच्याकडे सभांची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु यामुळं ठाकरेंच्या गटात असलेल्या इतर महिला नेत्यांना आपलं महत्व कमी झाल्याची भावना वाढली आहे. त्यातून गोऱ्हेंनी देखील ठाकरेंची साथ सोडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. केंद्रातील एनडीए सरकारनं घेतलेल्या धडाडीच्या निर्णयांमुळं आपण पुन्हा शिवसेना-भाजप युतीत अर्थात एनडीएत सहभागी झालो आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांच निवडणूक आयोगाला पत्र, पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही?

भाजपकडून शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न? शिंदे-फडणवीस यांची रंगली तब्ब्ल एक तास बैठक…

Chandrayan Launch, ‘या’ दिवशी अवकाशात झेप घेणार Chandrayan 3

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version