सुषमा अंधारे यांचा शिंदे – भाजप सरकारवर हल्लबोल

उद्धव गटाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली आहे. या महाप्रबोधन यात्रेत सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची भाषणे गाजताना दिसत आहे. आज वाशी येथे आयोजित महाप्रबोधन यात्रेच्या सभेत सुषमा अंधारे यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांचा शिंदे – भाजप सरकारवर हल्लबोल

उद्धव गटाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली आहे. या महाप्रबोधन यात्रेत सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची भाषणे गाजताना दिसत आहे. आज वाशी येथे आयोजित महाप्रबोधन यात्रेच्या सभेत सुषमा अंधारे यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे आम्हाला हिंदुत्व आणि निष्ठा शिकवणार का? असा प्रश्न शिंदे गटातील आमदार गेले काही दिवस सातत्याने विचारत आहेत. सुषमा अंधारेंना हाच प्रश्न विचारुन कोंडीत पकडू पाहत आहेत. विरोधकांच्या याच प्रश्नाला आज सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. अंधारेंच्या उत्तराने सभागृहात उपस्थित शिवसैनिकांनी काही काळ टाळ्यांचा गजर केला. शिवतीर्थावरील भाषणानंतर आणि ठाण्यातील फटकेबाजीनंतर आजही सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची सभा गाजवली.

“शिंदे गटातील लोक म्हणतायेत, तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे आम्हाला निष्ठा आणि हिंदुत्व शिकवणार का? मला त्यांना सांगायचंय, भलेही मी आधी शिवसेनेत नसेल पण संकटकाळात मी शिवसेनेत आले. तुम्ही ३० वर्ष सत्ता भोगली, आमदार-खासदार झाले. पण अडचणीच्या काळात सोडून गेले. ठाकरे संकटात असताना मी तुमच्यासारखी पळून गेली नाही. अन् मी निष्ठा शिकवली तर बिघडलं कुठे.. कधी कधी आजोबाला नात शिकवत असते…”, असं सुषमा अंधारे म्हणताच उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

‘आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार’, असं म्हणणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांचा अंधारेंनी खास स्टाईलमध्ये समाचार घेतला. गणेश नाईक-बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “गणेश नाईक शिवसेनेत होते त्यावेळी ते अवैध पद्धतीने खाणी कोरत आहेत, हे जेव्हा बाळासाहेबांना कळलं, तेव्हा त्यांनी गणेश नाईकांना खडसावलं. पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे, यासाठी त्यांनी गणेश नाईकांची कानउघडणी करत अवैध पद्धतीने खाणी कोरणं बंद करा, असा दमच दिला. आताही आदित्य ठाकरे जेव्हा आरेच्या आंदोलनात अग्रणी होते, तेव्हा ते एकप्रकारे बाळासाहेबांचा विचारच पुढे नेत होते. हे तरी शिंदे गटातील लोकांना कळलंय का…?”

तसेच सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लक्ष करत म्हटलं आह की, मोदींजींना विचारायचे असेल तर मला हिंदी मधूनच बोलावे लागेल. बोली भाषेत बोलून काय उपयोग. त्या म्हणल्या आहेत की, मोदीजी आम्हाला आटा पाहिजे, डाटा नाही. यातच मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी सुषमा अंधारे, भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना त्या म्हणल्या की, ”दीदी ओ दीदी, असे व्यक्तव्य मोदी यांनी बंगालमध्ये केले होते, ते चालते काय?” यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, ”भारतीय संविधानाची चौकट मोडण्याचा डाव भाजपा करत आहे. ते उघडे करण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे.” ऋतुजा लटके यांच्यावरून बोलताना त्या म्हणाल्या की, सत्ता वेगवेगळ्या ठिकाणी असावी, विकेंद्री असावी असं संविधान आहे. असे असताना मुंबई मनपा जाणीव पुर्वक राजकीय भूमिकेत जात आहे.

अंधारे म्हणाल्या आहेत की, मी गरीब लेकरू असूनही मला चितावणीखोर बोलतात. सरकार नसताना सुध्दा तुम्हाला आमची ऐवढी धास्ती आहे. त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी धमक्या दिल्या म्हणजे ते सतसंग सांगत आहेत. त्यांचा रडीचा डाव आम्ही या महाप्रबोधन यात्रेत उघडे पाडणार आहे. मी सत्तेच्या काळात नाही, तर अडचणीच्या काळात आली आहे.

शिंदे आणि ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, फडणीस यांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिंदे यांना चिन्हासाठी मदत केली. फडणवीस आणि शिंदे या दोन तलवारी एकाच ठिकाणी कशा राहणार. अंधारे म्हणाल्या, भाजपाचा युएसपी जातीयवादी आहे. लोकांना घरे नाहीत. मग मोदीची घरघर तिरंगा कसा पोचणार? देशात अनेक भागात महिलांवर अन्याय झाले. अत्याचार झाले, आता स्मृती इराणींच्या स्मृतीस काय झाले.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सरकार उध्दव ठाकरे यांच्यावर अन्याय करायला बसलं आहे की, जनतेचे प्रश्न सोडवायला? पहाटे पहाटे भाजपाने राष्ट्रवादी बरोबर शपथ घेतली, ते काय नैसर्गिक होते की, अनैसर्गिक? माझ्या पक्ष नेतृत्वाकडे जो कोणी बोट दाखवेल त्याचा व्याजा सकट नाही तर चक्रवाड व्याजासहीत वसूल केले जाईल. बाई म्हणून हलक्यात घेवू नका.

शिवसेना अभूतपूर्व संकटात सापडलेली असताना सुषमा अंधारे यांनी सेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून पक्षाची भूमिका त्या जोरदारपणे मांडत आहेत. या आठवड्यापासून त्यांची महाप्रबोधन यात्रा सुरु झालीये. चार दिवसांपूर्वी ठाण्यातून महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभ झालेला असताना आज ही यात्रा नवी मुंबईत पोहोचली आहे. खासदार राजन विचारे यांच्या भाषणानंतर सुषमा अंधारे यांनी तुफान भाषण केलं. त्यांच्या भाषणाला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

हे ही वाचा :

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

ऋतुजा लटके यांच्या बाजूने लागल्यालानंतर ठाकरे गटातील महिलांच्या प्रतिक्रिया; आम्ही थेट भिडणारे लोक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version