भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा पोलिसांच्या अटकेत, घरगुती नोकराचा छळ केल्याचा आरोप

भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा पोलिसांच्या अटकेत, घरगुती नोकराचा छळ केल्याचा आरोप

घरगुती नोकराचा छळ केल्याचा आरोप असलेल्या भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना रांजी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या अटकेच्या भीतीने सीमा पात्रा ह्या पळून गेल्या होत्या, त्यानंतर रांचीमधील अरगोरा पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. घरगुती मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या सुनीता यांना जिभेने शौचालय साफ करायला लावल्याचा आरोप सीमा यांच्यावर आहे. सुनीताच्या शरीरावर अनेक जखमा होत्या,असे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर ‘मला गरम वस्तूंचे चटके दिले जायचे’ असा आरोप देखील सुनीता केला.

माजी आयएएस अधिकारी महेश्वर पात्रा यांच्या पत्नी पात्रा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि एससी-एसटी कायदा, १९८९ च्या कलमांखाली रांचीमधील अर्गोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १६४ अन्वये मंगळवारी सुनीताचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला. झारखंड भाजपने सीमा पात्रा यांच्यावर घरगुती नोकराचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित केले.

हेही वाचा : 

सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

महेश्वर आणि सीमा पात्रा हे दांपत्य रांचीतील अशोकनगरमध्ये राहतात. पीडित मुलगी सुनीता ही गुमला येथील रहिवासी आहे. पात्रा दांपत्याला दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर सुनीता दहा वर्षांपूर्वी घर कामासाठी दिल्लीला गेली. सहा वर्षांपूर्वी रांजीला ती परत आली तिला काम सोडायचे होते पण, तिला आठ वर्षे दाबून ठेवण्यात आले होते. अखेरच्या दिवसात सुनीताला चालता येत नव्हते. आजारी असताना तिला शौचालयाला झाले असता. पात्रा दांपत्य तिला जिभेने ते साफ करायला लावायचे.

सुनिता वर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध आदिवासी संघटनाच्या सदस्यांनी मंगळवारी राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला भेट देऊन तिच्या तब्येतीची विचारपूस देखील केली.

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Exit mobile version