spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

T20 World Cup In Marathi : मनसेच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरेंना भेटणार ‘स्टार’

ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जारी झालं आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच (Australia) विद्यमान टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आहे. त्यामुळे, यंदा कोण चॅम्पीयन होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

T20 World Cup In Marathi : ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जारी झालं आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच (Australia) विद्यमान टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आहे. त्यामुळे, यंदा कोण चॅम्पीयन होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रत्येक क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधी चाहत्यांना प्रतिक्षा असते, ती भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची. २०२२ वर्ल्डकप मध्येही भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. मात्र, यंदा मराठीजनांसाठी हा वर्ल्डकप अधिक आपलासा असणार आहे. कारण, मराठी भाषेतही या सामन्यांचं समोलोचन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोणतीही विश्वचषक स्पर्धा मराठीमध्ये प्रक्षेपित झालेली आपण पाहिली नाही. पण यावर्षी होणारा विश्वचषक मात्र मराठीमध्ये प्रक्षेपित होणार आहे. कारण मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने याबाबत मोठे आंदोलन केले.

स्टार स्पोर्टस ही वाहिनी क्रिकेटचा विश्वचषक प्रसारीत करीत आहे. महाराष्ट्रीत लाखो चाहते हा विश्वचषक पाहणार त्यामुळे अन्य प्रादेशिक भाषांमध्ये जर विश्वचषकाचे प्रसारण होत आहे, तर ते मराठीत का होऊ शकत नाही. स्टार स्पोर्ट्स मराठीला दुय्यम वागणून देत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर स्टार स्पोर्ट्सला जागं करण्यासाठी आंदोलन केले. स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतही प्रसारण व्हावे, असा अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आला आहे. अन्यथा मनसे स्टार स्पोर्ट्स वाहिनीला आपल्या पद्धतीने धडा शिकवेल, असा इशारा राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

 मनसे आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमते घेत या आंदोलनाला घाबरून थेट राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शनिवारी दुपारी १२.३० वाजता स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर विश्वचषकाचे मराठीत प्रक्षेपण सुरु होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. कारण, यंदा भारतामधील अन्य प्रादेशिक भाषांमध्ये विश्वचषक प्रक्षेपित करण्यात येणार आहे, मग मराठीमध्ये का नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला होता. त्यामुळे, स्टार स्पोर्ट्सकडून मराठीचाही मान राखला जाईल, असे दिसून येते.

मनसेचे टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतिश नारकर यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, स्टार स्पोर्ट्सला जागं करण्यासाठी आणि मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेकडून शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता हे आंदोलन स्थगित झाले आहे.

हे ही वाचा :

G. N. Saibaba : प्रा. साईबाबांच्या निर्दोष सुटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

INS Arihant : INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss