spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुस्लिमांच्या मतदानाचे काढून घ्या, “या” नेत्याने केली खबळजनक मागणी,

या देशातील शंभर टक्के मुसलमान तुम्हाला हिंदू धर्माचे विरोधक आणि शत्रू वाटतात. या देशाचं संविधान पाहिजे तशी बदलण्याचे अधिकार तुमच्या हातात आहे तर मग एक कायदा करा. त्या कायद्यामध्ये भारतातील मुस्लिमांना ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान देऊ नका.

सध्या राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष आगामी काळात येऊ ठाकलेल्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी कार्टकर्टन पाहायला मिळत आहेत. पण त्यातच संभाजी ब्रिगेडचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुस्लिमांच्या मतदानावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुस्लिमांना सातत्याने टार्गेट केलं जात असल्याच्या मुद्द्यावरून पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपला सुनावलं आहे. या देशातील शंभर टक्के मुसलमान तुम्हाला हिंदू धर्माचे विरोधक आणि शत्रू वाटतात. या देशाचं संविधान पाहिजे तशी बदलण्याचे अधिकार तुमच्या हातात आहे तर मग एक कायदा करा. त्या कायद्यामध्ये भारतातील मुस्लिमांना ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान देऊ नका. एकदा मुस्लिमांचे सर्वच्या सर्व अधिकार काढून घेतले तर फक्त हिंदू उरतील. त्यानंतर निवडणुका होऊ द्या . मग बघू तुम्हाला बहुमत कसं काय मिळतं?, असा हल्ला खेडेकर यांनी भाजपवर चढवला.

सिंदखेड राजा येथे पुरुषोत्तम खेडेकर यांची सभा चालू होती. त्या सभेला संबोधित करताना खेडेकर यांनी भाजपला हे खडेबोल सुनावले. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांचं सरकार यायचं स्वप्न आहे. ते एक गाव एक स्मशानभूमीमुळे पूर्ण होईल. आज ज्यांना पुरस्कार देण्यात आले. ते भारतरत्नच्या दर्जाचे आहेत. मात्र, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे केंद्रात सरकार आल्याशिवाय ते करता येणार नाही,” असं खेडेकर म्हणाले.

पुढे,”सुधीर मुनगंटीवार यांनी जिजाऊ सृष्टीसाठी केंद्रातील मंत्र्यांना घेऊन एक बैठक घेऊ, अशी माहिती दिली. कोणीतरी येईल आणि तुमचं कल्याण करेल हे डोक्यातुन काढून टाका. मोर्च्यामुळे फायदे की नुकसान ही एक संशोधनाची बाब आहे. हनुमानाने सूर्य हातात घेतला की नाही हे माहीत नाही. त्या वादात पडायचंही नाही, मात्र आता आपल्या मुलाने जगाची सफर केली पाहिजे, असा विचार करण्याची गरज आहे,” असं खेडेकरांनी म्हटलं आहे.

आपले तिकडचे बहुजन बदमाश आणि बिनडोक आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी भाजपवर केली. त्यानंतर त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते यांच्या छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच आहेत या विधानाला पाठींबा देखील दर्शवला. यावेळी ते म्हणाले,”छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच आहेत,” असा दावा करत अजित पवार यांना समर्थन दिले.

हे ही वाचा:

मुंग्यांच्या चटणीपेक्षा विचित्र पदार्थ खाल्ले जातात भारताच्या ‘या’ भागात, नावं वाचून व्हाल आश्चर्यचकित

शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे , तर या गोष्टींचा आहारात करा समावेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss