spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तानाजी सावंतांची जीभ घसरली, आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज

शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाचे वाद हे काही थांबायचे नाही घेत नाहीत. हळू हळू यांचे वाद हे आणखी जास्त वाढू लागले आहेत. अश्यातच आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाचे वाद हे काही थांबायचे नाही घेत नाहीत. हळू हळू यांचे वाद हे आणखी जास्त वाढू लागले आहेत. अश्यातच आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. आणि त्यामुळे आता शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. तानाजी सावंत हे १० फेब्रुवारी वाकाव या गावामध्ये आले होते. तिथे सावंत परिवाराचे ग्रामदैवत आहे आणि तिथे लोकापर्ण सोहळा करण्यात आला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आदित्य ठाकरे (Aditya Thakare) यांना मेंटल रुग्णालयात (Mantal Hospital) भरती करण्याची गरज आहे. राज्याचा आरोग्य मंत्री म्हणुन माझ्या विभागामध्ये राज्यात चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार हॉस्पिटलपैकी एका रुग्णालयात एक बेड आदीत्य ठाकरेंसाठी आरक्षित ठेवणार आहेत असे ते म्हणाले.

आरोग्य मंत्रांच्या या टीकेवर शिवसेनेचे प्रवक्ते लक्षण हाके यांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके हे म्हणाले सर्व शिव सैनिक वर्गणी काढून तानाजी सावंत याच्यासाठी कृपामाई मेंटल हॉस्पिटल (krupamai mental Hospital) मध्ये बेड राखून ठेवणार आहेत असे ते लक्ष्मण हाके म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्याना वारंवार आव्हान करत असलेले आदित्य ठाकरे यांची मानसिक स्तिथी ठिकाणावर नाही त्यासाठी त्यांना मेंटल रुग्णालयात भरती करण्याची आम्ही सोय करू असे तानाजी सावंत म्हणाले होते.

सावंत यांनी आदित्य ठाकरे वर टीका केल्यावर आता सर्व शिव सैनिक संतप्त होऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. सावंत यांच्या पुतळ्याचे दहन माळशिरस तालुक्यात केले. सावंत याचे डोके ठिकाणावर नाही त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणार आहे. या शब्दांमध्ये शिवसैनिक आरोग्यमंत्रांवर टीका करत आहेत. संतप्त होऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागले आहेत. माळशिरस तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी सावंत याच्या पुतळ्याचे दहन करू राग व्यक्त केला आहे. युवासेना तालूख प्रमुख वैभव काकडे यांनी सावंत याच्यावर निशाणा साधला आहे. सावंत यांचे डोके ठिकाणावर आहे का असे ते वक्तव्य करू लागले आहे. त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागणार आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व शिवसैनिक वर्गणी काढून कृपामाई हॉस्पिटलमध्ये एक बेड राखीव ठेवणार आहे. सावंत यांना रुग्णालयाची गरज असल्याचे शिवनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके म्हणाले. उत्तर देताना सावंत यांनी मोदी यांच्या त्याग भावामुळं आपण उपमा दिल्याचे सांगितले. सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या या जहरी टीकेमुळे शिवसैनिक संतापले आहेत. आदित्य ठाकरे याना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायचे वक्तव्य करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भगवान शंकराची उपमा दिली होती. कोरोना काळात देशात १५० कोटी जनतेसोबत परदेशातील कोरोना रुग्णांनाही मोदी यांनी लस पाठवली होती. यातून त्यांची मानवता त्यांची मानवता दिसते. त्यामुळं त्यांचा उल्लेख केल्याचे सावंत यांनी केला आहे असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

Narendra Modi In Mumbai, ‘मोदींच मिशन मुंबई’, जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Google Doodle ने मल्याळम सिनेमातील पहिल्या महिला लीडचा केला सन्मान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss