आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात आज औरंगाबादमध्ये शिक्षकांचा भव्य मोर्चा

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात आज औरंगाबादमध्ये शिक्षकांचा भव्य मोर्चा

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक आणि भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता शिक्षकांनी आमदार बंब यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून, आज ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यलयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे. काही दिवसांआधी प्रशांत बंब यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर शिक्षकांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत बंब यांनी केलेल्या मागणीच्या विरोधात हा मोर्चा निघाला आहे. आणि महत्वाचे म्हणजे या मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक-पदवीधर आमदार करणार आहे.

हेही वाचा : 

अरुण गवळीच्या पत्नीची सुटका नाहीच, ‘या’ प्रकरणी सत्र न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

मोर्च्याचे स्वरूप कसे असेल ?

या सर्व मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक आमदार कपिल पाटील, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे आणि आमदार सुधीर तांबे हे करणार आहे. तर औरंगाबादच्या आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असा भव्य मोर्चा असणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात येईल. या मोर्च्यात राज्यभरातील शिक्षक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांकडून दावा करण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र सामन्यातून अमित शहांना सल्ला

नेमकं प्रकरण काय ?

५ सप्टेंबरला शिक्षकदिनी प्रशांत बंब यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांचं पूजन केलं. औरंगाबादच्या बजाजनगरमध्य राहणाऱ्या शिक्षिकेचं त्यांनी पूजन केलं आहे. दीपाली भगवान मकरंद असं या शिक्षिकेचे नाव आहे. शाल आणि श्रीफळ देऊन त्यांनी हा सत्कार केलाय. हात जोडत त्यांनी शिक्षकांच्या कार्यप्रति आदर व्यक्त केला.

राज्यातील ७० टक्के शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. मुख्यालयी राहण्याचं आम्हाला बंधन नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यांना कुठेही राहून घर भाडं भत्ता मिळत आहे. प्रत्येक गावात जाऊन शिक्षकांची घरे पाहिली. तिथे शिक्षक राहत नव्हते. ९० टक्के शिक्षक त्याच गावात राहत नव्हते. शिक्षक हे धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोप बंब यांनी केला होता. अशा प्रकारे आता हा वाद शिगेला पोहचला आहे.

प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार वाद, सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

Exit mobile version