Monday, July 8, 2024

Latest Posts

Team India Victory Parade: क्रिकेट खेळाडूंसाठी गुजरातची बस कशाला ? Nana Patole यांचा सवाल

म इंडियाच्या विजयी मिरवणुकीसाठी एक खास बस (Team India Victory Parade Bus) बनवण्यात आली होती. मात्र यावर नवा वाद चालू झाला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी यावरून जोरदार टीका केली आहे.

टी २० वर्ल्डकप (T 20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी परेडमध्ये (Team India Victory Parade) लाखो मुंबईकरांनी मरिन ड्राईव्ह (Marine Drive) येथे अफाट गर्दी केली होती. विश्व विजेते झालेल्या आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेल पासून निघालेली हि विजययात्रा वानखेडे स्टेडियम पर्यंत (Wankhede Stedium) पोहोचली. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीसाठी एक खास बस (Team India Victory Parade Bus) बनवण्यात आली होती. निळ्या रंगाच्या या भव्य बसवर जगजेत्या भारतीय संघाची फोटोस लावण्यात आले होते. स्टार भारतीय खेळाडूंनी भरलेली हि बस आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. आता मात्र यावर नवा वाद चालू झाला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी यावरून जोरदार टीका केली आहे.

विजयी मिरवणुकीसाठी बनवण्यात आलेली हि खास बस गुजरातमधून आणली गेली होती. मुंबईमध्ये त्या बसला सजवून विजयी मिरवणुकीसाठी तयार केले होते. मिरवणूक सुरु होण्याच्या आधीपासूनच हि बस आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. मात्र आता यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका करत, “क्रिकेट खेळाडूंसाठी गुजरातची बस कशाला?” असा सवाल उपस्थित केला आहे.

टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी राज्य सरकारने गुजरातमधून बस आणली यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “राज्यातील महायुतीचे सरकार हे गुजरातधार्जिणे आहे, मोदीशाहला ते त्यांचा आका म्हणतात. बेस्टकडे चांगल्या दर्जाची ओपन बस असताना वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून बस आणणे हा खेळाडूंचा अपमान आहे. दिल्लीच्या आदेशावरून गुजरातची बस मुंबईत आणली असावी. खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे पण त्यासाठी गुजरात समोर झुकण्याची गरज नव्हती, असेही नाना पटोले म्हणाले.”

World Cup जिंकलोय तर आपण नाचायला पाहिजे, Rohit Sharma ने दिली मराठीतून प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss