spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे, शिंदेंमध्ये नवा वाद; दोन्ही गटांना हवं असलेलं नवं नावही सारखंच

शिवसेना कोणाची यावरून दोन्ही गटामध्ये वाद पेटून आल्याचे दिसून येत आहे. काल निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यानंतर दोन्ही गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता कोणालाही शिवसेना असं नाव वापरता येणार नाही. त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट अशा प्रकारची नावं वापरता येतील. शिवसेना कोणाची हा वाद संपतोय असं वाटत असतानाच नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आता ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ या नावाची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय देऊनही पुन्हा नावाचा नवा वाद निर्माण झाला आहे.

शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने (Shinde Group) पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Bow And Arrow) आणि पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवताना शिवसेना (Shivsena) नाव वापरण्यासही मनाई केली. निवडणूक आयोगाने पर्यायी नाव वापरण्याची सूचना केल्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकच नाव समोर आले आहे. निवडणूक चिन्हा पाठोपाठ आता पक्षाच्या नावावरही दोन्ही गटांनी दावा केला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने आपल्या गटांना ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे आणि शिंदे गटासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. दोन्ही गट कोणतं नाव आणि चिन्ह निवडणार याबद्दल राज्याला उत्सुकता आहे. दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरता येणार नाही. मात्र त्यांना शिवसेनेशी संबंधित नाव वापरता येईल. त्यामुळे शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) अशी नावं घेतली जाऊ शकतात. गेल्या वर्षी लोकजनशक्ती पक्षात फूट पडली. या पक्षाची स्थापना रामविलास पासवान यांनी केली. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान आणि पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांच्यामध्ये पक्ष विभागला. त्यावेळी त्यांनी राष्ट्री लोक जनशक्ती पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अशी नावं घेतली होती.

आयोग चिन्ह कसं देणार?
निवडणूक आयोगाकडे चिन्हांची एक यादी तयार असते. त्याच्याकडे विविध चिन्ह तयार असतात. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. याबाबत दोन्ही गटाला कळवलं देखील गेलं आहे आणि नव्या चिन्हासाठी १० तारखेपर्यंत निर्णय होणार आहे. निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह ही दोन्ही गटांसाठी आधी उपलब्ध असतील. जर निवडणूक आयोगाकडे असलेली चिन्ह जर दोन्ही गटाला नको असतील तर त्यांच्याकडून आयोगाकडे विनंती केली जाईल. त्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गट आपल्याला हव्या असलेल्या चिन्हासाठी मागणी करतील त्यावर आयोग निर्णय घेईल.

हे ही वाचा:

Bigg Boss 16 : ‘रविवार का वार’ मध्ये होणार ‘या’ नव्या सेलिब्रिटीची एन्ट्री

भाजप केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss