spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नार्को टेस्टच्या मुद्यावर ठाकरे गट आक्रमक, नारायण राणेंवर गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन (Winter session) पार पडलं आणि या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून ठकरे गटाचे नेते आणि युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना दिशा सालियन (Disha Salian) आत्महत्या प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न केला गेला. तर गृहमंत्र्यांकडून (Home Minister) दिशा सालियन हत्या प्रकणात एस आय टी चौकशी सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. तर भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत (Assembly) करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं. तर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांचा गंभीर आरोप केला आहे.

एका आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. खासदार विनायक राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी नितेश राणे निघाला आहे. तुझ्या बापाच्या राजकारणाची कारकिर्द आठव. सख्ख्या चुलत भावाचे ज्याने घराच्या समोर डोके फोडले. एवढच नाही गाडीत घालून नांदगावला (Nandgaon) नेवून जाळून टाकलं, अशी तुमची औलाद, असा हल्लाबोल आणि गंभीर आरोप विनायक राऊत यांनी राणेंवर केला. नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीत जेवढे खून झाले. जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्यांची एसआयटी (SIT) चौकशी झाली पाहिजे. नाहीतर नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्यात यावी. जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडविला हे सर्वांना कळेल.

ज्यावेळी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg district) शिवसेना आली आहे तेव्हा पासून एकही खून त्या ठिकाणी झालेला नाही. आम्हला लोकांसाठी आणि शांतता कायम ठेवण्यासाठी काम करायचे नाही असं त्यांनी सांगितलं. पुढे विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना मोठा प्रश्न विचारला आहे. हिंमत असेल तर त्यांनी आपल्या ग्रामदेवतेची शपथ (village deity) घेऊन सांगा, कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या त्या पनवेलच्या रुग्णालयामध्ये लोकांना फसवले नाही. आलेल्या प्रत्येक रुग्णाला तुम्ही लुबाडलं नाही म्हणून सांगा. कोणाच्या काळात लाखोंचा करोडोंचा भ्रष्टाचार तुमच्या पनवेलच्या रुग्णालयात झाला. हिम्मत असेल तर ऑडिट करायला तयार राहा,असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलं आहे.

हे ही वाचा : 

गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

…पायाखाली आग तरी आमची डोकी थंड कशी, अजित पवारांच्या निषेधार्थ नवी मुंबईमध्ये काढण्यात आला मोर्चा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss