ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे घेणार माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीची भेट

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे घेणार माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीची भेट

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट घेतली आहे. त्याच्या राहत्या घरी उद्धव ठाकरे भेट घेण्यास गेले होते. जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही शिवसेना नेत्यांची सदिच्छा भेट झाली आहे. दरम्यान, कालच मनोहर जोशींनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं या भेटीला वेगळं महत्व आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोहर जोशींची भेट घेतली होती त्यामुळं आता जोशी देखील शिंदे गटात सामिल होणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं होतं. पण खुद्द जोशींनीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना माझं रक्त हे शिवसेनेचं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा सहवास, उद्धव ठाकरेंचा सहवास मला लाभला आहे. त्यामुळं मी शिवसेनेचाच आहे. दरम्यान, शिवसेनेत उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रीय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशींचा प्रभाव कमी होत गेला होता. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनोहर जोशी आता शिंदे गटात सामिल होतील अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. पण त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

जोशींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ठाकरे कुटुंबिय जोशींच्या घरी गेले आहेत. पण येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांची भेट महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), मुलगा आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील आहेत.

हे ही वाचा : 

Daar Ughad Baye शरद पोंक्षे फेम रावसाहेब दिसणार महिलेच्या वेशात, मालिकेला आलं रंजक वळण

Measles Disease गोवरचा राज्यात धुमाकूळ! आतापर्यंत १८ बालकांचा मृत्यू

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version