spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाचे खासदार उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता

सध्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाला वेग आला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter session) उद्यापासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे (Karnataka border) पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येत केंद्रीय गृहमंत्र्यांची (Union Home Minister) भेट घ्यावी, असं आवाहन केलं आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संसदेत आवाज उठवण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये आज महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. अमित शाह यांना या मुद्यावर निवेदन दिलं जाण्याची शक्यता आहे. शाह यांच्या भेटीची वेळ मागण्यात आल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे खासदार या प्रश्नावरुन आक्रमक आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खासदार महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे. कर्नाटकात आज महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर हल्ला झाल्यानं वातावरण तापलं आहे. कर्नाटकातील हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ ही घटना घडली. महाराष्ट्रातील राज्यसभेचे १९ आणि लोकसभेचे ४८ खासदार एकत्र येऊन हा प्रश्न केंद्र सरकारपुढं मांडणार का हे उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात दिसून येईल.

संजय राऊत यांनी महाराष्ट्र जर पेटला तर या सरकारला भारी पडेल. डोळे मिटून बसला आहात का? स्वाभिमान, अस्मिता, अभिमान महाराष्ट्राचा, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही की सगळं खोक्यांमध्ये वाहून गेलं आहे. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांवर शिंदे फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्या काठ्यांचा वापर करत आहेत. शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करु नये. सरकार काय करत आहे, मुख्यमंत्री कुठं आहेत? त्या काळात लाठ्या काठ्या झेलल्याचं सांगतात. लाठ्या काठ्या कधी खाल्या आहेत जर त्या खाल्या आहेत तर तुम्ही ज्या महाराष्ट्राचा अपमान सहन केला नसता. राज्यात सध्या अत्यंत दुर्बल, लाचार आणि कमकुवत सरकार आहे. आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

Oh My God 2 अक्षय कुमार आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’मधून देणार लैंगिक शिक्षणाचे धडे, सोशल मीडियात चर्चा

शरद पवारांचं कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अल्टीमेटम

Bigg Boss Marathi 4 : रोहित शिंदेने रुचिरा बरोबर असलेल्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss