ठाकरे गटाची आजपासून राज्यभरात ‘शिवगर्जना’

गेल्या ८ महिन्यापासून शिवसेनामध्ये अंतर्गत वाद हे सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला.

ठाकरे गटाची आजपासून राज्यभरात ‘शिवगर्जना’

गेल्या ८ महिन्यापासून शिवसेनामध्ये अंतर्गत वाद हे सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला. आणि शिवसेनेमध्ये ठाकरे गट आई शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत. त्यांनतर एकीकडे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल . त्यामुळं ठाकरे गट हा चांगलाच आक्रमक झाला आहे. तर आजपासून (दि. २५ फेब्रुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे राज्यभर शिवगर्जना आणि शिवसंवाद (Shiv Samvad) अभियान सुरु झाले आहे.

ठाकरे गटाचे आजपासून संपूर्ण राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद (Shiv Samvad) अभियान सुरु झाले आहे. आज पासून ते दि. ३ मार्च पर्यंत हे अभियान सुरु असणार आहे. शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. २७ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असल्यानं आमदारांचा या अभियानात समावेश नाही.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिले त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे. तसेच ठाकरे गटाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानासाठी जिल्हावार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाखांची माहिती, पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहिती या अभियानाद्वारे घेतली जाणार आहे.

 

हे ही वाचा :

Madhya Pradesh मध्ये भीषण अपघात, अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात

एकनाथ शिंदे जे बोलतो तेच करून दाखवतो, एकनाथ शिंदे कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणाले

भारतामधील प्रसिद्ध दिगर्शक संजय लीला भन्साळी यांचे काही हिट चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version