ठाकरेंनी मातोश्रीचं महत्त्व कमी केलं – प्रवक्ते नरेश म्हस्के

Naresh Mhaske : राहुल गांधी यांनी मातोश्रीवर येण्यापासून पाठ फिरवल्याने शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ठाकरेंनी मातोश्रीचं महत्त्व कमी केलं – प्रवक्ते नरेश म्हस्के

Naresh Mhaske : राहुल गांधी यांनी मातोश्रीवर येण्यापासून पाठ फिरवल्याने शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.  मातोश्री बद्दल आस्था असणारा मी शिवसैनिक असल्याचं म्हस्के यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं. आज मातोश्रीचा जो काही अपमान झाला त्याबद्दल बोलण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हंटल. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी राहुल गांधी मातोश्रीवर येणार असं सांगितलं होतं असं म्हणत म्हस्केंनी संजय राऊंतांना टोला लागवला.

ज्या वास्तूत बाळासाहेबांचा स्पर्श आहे. अशा वास्तूत राहुल गांधी येतोय आणि हे लोटांगण घालत आहेत. असं म्हणत उद्धव ठाकरेंवर प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जहरी टीका केली. त्यात राहुल गांधी स्वतः आले नाही त्यांनी त्यांचा सहाय्यक मातोश्रीवर पाठवला. हा मातोश्रीचा अपमान असल्याचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे. कुठे गेली ठाकरे नावाची किंमत? ज्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणं ही राष्ट्रपतींसाठी ही मोठी गोष्ट वाटतं होती. त्या मातोश्रीचे महत्त्व यांनी कमी केलं असं म्हणत म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डांगल आहे. सिल्व्हर ओकवर पण ते नाक घासून आलेत, आणि आता ते दिल्लीला मुजरा करायला जात आहेत. असं म्हस्के म्हणाले.

त्याचबरोबर प्रवक्ते नरेश मस्के यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर देखील भाष्य केलं आहे. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अजित पवार त्यांच्यासारखे मतबर नेते असताना कोणत्या नेत्याला आवडणार आहे १५ आमदार असणाऱ्या नेत्याला छाताडावर घ्यायला. असं म्हणत नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सोबतच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादीला सोडणार या चर्चेला पूर्णविराम लावल्यानंतर यावर देखील प्रवक्ते नरेश मस्के यांनी विशेष खुलासा केला आहे. शुगर वाढल्याने ऑपरेशन पुढे ढकल याचे भाकीत म्हस्के यांनी केले आहे. अजित दादा नाराज आहेत हे स्पष्ट होत आहे. अजित दादा यशस्वी उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादीचे आमदारही चर्चा करत आहेत आमचे ५६ आमदार असून आम्हाला किंमत नाही. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत हे स्पष्ट झाला आहे. महाविकास आघाडीत अजित पवारांची गळचेपी होत असल्याचं शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

Sharad Pawar Live, राजकीय चर्चांवर अखेर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण, कुठलीही बैठक ही…

महाराष्ट्राच्या राजकारणात आता दुसरा भूकंप? धाकट्या पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version