Thackeray Vs Shinde : शिंदेंच्या ४० आमदारांना उद्धव ठाकरे शिकवणार धडा? काय आहे ‘मिशन ४०’?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. मोठा राजकीय संघर्षही सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. दिवसेंदिवस हा संघर्ष अधिकाधिक पेटतानाच दिसत आहे.

Thackeray Vs Shinde : शिंदेंच्या ४० आमदारांना उद्धव ठाकरे शिकवणार धडा? काय आहे ‘मिशन ४०’?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. मोठा राजकीय संघर्षही सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. दिवसेंदिवस हा संघर्ष अधिकाधिक पेटतानाच दिसत आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी योजना आखलेली आहे.या ४० आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून वेगळे झालेल्या ४० आमदारांना धक्का देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नवी रणनीती आखली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्याकडून या ४० आमदारांच्या मतदारसंघामध्ये नवी नेतृत्व उभारली जात आहे. आत्तापासून ठाकरेंनी लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याच्याच पार्श्वभूमीवर सध्या उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या शोधात आहेत, जे या ४० जणांना शक्तिशाली पर्याय ठरू शकतील.

निवडणुका लढवण्यासाठी तसंच सर्वोच्च न्यायालयातल्याही लढाईसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. आदित्य ठाकरे सातत्याने महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. विशेषतः बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाकडे त्यांचं लक्ष अधिक आहे. तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे याही आपल्या आक्रमक शैलीत भाषण करत राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेही राज्यभर दौरा करणार आहेत. नुकतंच त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची शेतात जाऊन भेट घेतली आणि पाहणी केली.

उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय आहे ?

हे ही वाचा :

Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवसानिम्मित, ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

MIDC ने दिली महत्वाची माहिती; ठाकरे गटाच्या दिरंगाईमुळेच प्रकल्प…

Gas Cylinder Blast : दादरच्या छबीलदासमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version