ठाकरेंचा अंधेरी पोटविडणुकीसाठी प्लॅन ‘बी’ तयार; ऋतुजा लटके यांना उमेदवारी न मिळाल्यास…

उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. महाविकासआघाडीतर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारा देण्यात आली असून, त्यांचा प्रचार देखील सुरु झालाय. मात्र, BMC जॉबमुळे ऋतुजा लटके अडचणीत आल्या आहेत. या काही गोंधळ झाल्यास पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाने प्लॅन B तयार केला आहे अशी देखील चर्चा आता होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अंधेरी पोटनिवडणुकीसाठी प्लॅन बी तयार केलं आहे असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं होतं. अंधेरी पोटनिवडणुकी साठी अर्ज दाखल करण्यातही शेवटचा एक दिवस शिल्लक आहे. तरी अजून पालिकेनी ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अर्जावर निकाल दिला नाही. जर ऋतुजा लटके यांना उमेदवारी मंजूर न झाल्यास, लटके यांचे निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक संदीप नाईक यांची उमेदवारीसाठी चर्चा सुरु आहे, या शिवाय लटके यांच्या आईचं आणि बंधूच नाव सुद्धा चर्चेत असल्याचं समजत आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत (BMC) लिपिक पदावर नोकरीस आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने अद्यापही हा राजीनामा मंजूर केला नाही. त्याविरोधात आता शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात आज सुनावणी होणार असून आजच निर्णय अपेक्षित आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. त्यावेळीही आयुक्तांनी थेट भाष्य करणे टाळले. त्यानंतर शिवसेनेने मुंबई हायकोर्टाने बुधवारी तात्काळ याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून आजच हायकोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या मुद्दावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

मी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार; ऋतूजा लटके यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

३० दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल; ऋतुजा लटके यांच्या अर्जावर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version