“प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी..” फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची हवागुल?

आपलीच शिवसेना (shivsena) खरी आहे आणि आपल्यालाच पक्षाचं नाव आणि चिन्हं मिळावं म्हणून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरू आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला ट्रक भरून भरून प्रतिज्ञापत्रं देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटानेही निवडणूक आयोगाला ११ लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्रं दिली आहेत.

“प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी..” फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची हवागुल?

आपलीच शिवसेना (shivsena) खरी आहे आणि आपल्यालाच पक्षाचं नाव आणि चिन्हं मिळावं म्हणून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरू आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला ट्रक भरून भरून प्रतिज्ञापत्रं देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटानेही निवडणूक आयोगाला ११ लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्रं दिली आहेत. मात्र, या प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्याने अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याचं वृत्त आहे. हे वृत्त आलेलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या प्रतिज्ञापत्रावरून एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाची हवाच गुल झाल्याचं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रतिज्ञापत्रावरून मोठं विधान केलं आहे. कोण कशाच्या बातम्या करतं मला माहीत नाही. निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रं लागत नाहीत. एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची किंवा चिन्हं द्यायचं याचे निवडणूक आयोगाचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी दिलेले निर्णय हे प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्रं किती आहेत? कुणाचे प्रतिज्ञापत्र रद्द झाले. कुणाचे टिकले हे सर्व स्वत:च्या समाधानासाठी चाललं आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कालपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची चर्चा आहे. दुपारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल असं स्पष्ट केलं. त्यानंतर फडणवीस हे रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याचं कळतं. त्यावरही फडणवीस यांनी उत्तर दिलं. जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते, असा टोला त्यांनी लगावला.

महापालिका निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्पर विधाने केली होती. त्यावरून सरकारमध्येच महापालिकेच्या निवडणुकांवरून बेबनाव असल्याचं चित्रं झालं होतं. त्या संदर्भात फडणवीस यांनी सविस्तर खुलासा केला. कोर्टाचा निकाल लागेल त्यानुसार निवडणुका होतील. निवडणुका कधी घ्यायच्या याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम तयार केला होता. त्याविरोधात कोर्टात केस सुरू आहे. त्या केसचा निकाल लागेल तेव्हा निवडणुका होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. हे सरकार पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आदित्य ठाकरे यांच्या या उत्तरावर फडणवीस यांनी उत्तर देणं टाळलं. ठिक आहे. त्याला काय. उत्तर देण्या लायक नाही ते, असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस एकत्र राज्याचा दौरा करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही काही ठिकाणी सोबत आहोत. काही ठिकाणी वेगवेगळा दौरा करणार आहोत. पण दौरा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरी केली दिवाळी

ठाकरेंच्या आधीच, शनिवारपासून शिंदे-फडणवीसांचा एकत्रित महाराष्ट्र दौरा

अरविंद केजरीवाल यांचे केंद्र सरकारला आवाहन; ‘नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी गणेशाचे फोटो’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version