भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहवी – दीपक केसरकर

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहवी – दीपक केसरकर

शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणती यावर मोठा संघर्ष दिसून येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज त्यांनी अंबाबाई मंदिरात भेट देत देवीचे आशीर्वाद घेतले. अंबाबाईची सेवा माझ्याकडून व्हावी, अशी देवीची इच्छा असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर दिली. भाजप आणि सेनेला जोडणारा मी दुवा असून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहवी यासाठी माझा प्रयत्न आहे. असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

कोल्हापुरात असतानाच पालकमंत्री झाल्याचं समजले. बुधवारपासून कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन आव्हान देत असलेल्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दीपक केसरकर यांनी चांगलाच हल्ला चढवला. ज्यांनी खुरा खुपसला त्यांच्या सभांना गर्दी होत असेल तर, वस्तुस्थिती समोर यायला हवी असे केसरकर म्हणाले. केसरकर यांनी आदित्य ठाकरे मंत्रालयात आपल्या कार्यालयात किती वेळा गेले हे जाहीर करावे, असे आव्हान दिले. जे कार्यालयात जाऊ शकले नाहीत ते इन्वेस्टमेंट काय आणणार? असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. प्रकल्प कसे आणायचे आम्हाला चांगलं माहीत आहे. आदित्य ठाकरे खोटं बोलून महाराष्ट्रभर फिरत असतील, तर ही ग्लोबेल्स नीती असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तुम्हाला पर्यटन आणि उद्योगावर बोलायचं काय अधिकार? तुम्ही खोटं सांगत असाल, तर आम्हालाही खरं सांगत महाराष्ट्रभर फिरावं लागेल, असे केसरकर म्हणाले.

अमरावतीत बालकांच्या ICU मध्ये लागली अचानक आग, दोन बालके जखमी

शिवाजी महाराज, शाहू महाराज ताराराणीच्या पराक्रमाचे प्रतिक कोल्हापूर असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूरच्या हेरिटेज इमारती तालमी यांकडे विशेष लक्ष असेल, तालमींना कशी मदत करता येईल याचा प्लॅन तयार करायला सांगितला आहे. सातारा, कोल्हापूर गादीच महत्व जपलं पाहिजे असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

कोरोना काळात तुम्ही रात्री… अंबादास दानवेंचा पलटवार

गोंदियामध्ये आदिवासी आश्रमशाळेचा हलगर्जीपणा उघडकीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version