सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंचही होणार निलंबन? हायकमांडची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस

सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंचही होणार निलंबन? हायकमांडची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणुकीची (Graduate Election) तयारी जोरदार सुरु झाली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या (Nashik Graduate Constituency) निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याप्रकरणी सुधीर तांबेंनंतर आता सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या हायकमांडकडून तशा सूचना देण्यात आल्याचं समजत आहे. कालच त्यांचे वडील सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने त्याची काँग्रेसने गंभीरपणे दखल घेतली असून सुधीर तांबे यांना कालच पक्षातून निलंबित केलं आहे. तर, सत्यजित तांबे यांनाही पक्षातून निलंबित करा, असे आदेशच दिल्लीतून हायकमांडने (High Command from Delhi) राज्य काँग्रेसला दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्य काँग्रेस कोणत्याही क्षणी सत्यजित तांबे यांची पक्षातून निलंबित करण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना हायकमांडने दिल्याचं वृत्त आल्यानंतर सत्यजित तांबे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींवर सत्यजित तांबे येत्या १८ आणि १९ जानेवारी रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे सत्यजित तांबे काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी (Nashik Graduate Constituency) अखेर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म (AB form) जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसची तांबेंवर कारवाई, सुधीर तांबें पक्षातून निलंबित

शुभम गिलच्या पाठोपाठ विराट कोहलीने ठोकले शतक

Collage Festival, ‘अंतरंग’ फेस्टिवलमध्ये रंगले कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version