महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सर्वात मोठी अपडेट, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेले होते. आज घटनापीठाने हे प्रकरण पहिल्याच क्रमांकावर सुनावणीसाठी घेतलं होतं. पण आता पुन्हा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सर्वात मोठी अपडेट, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेले होते. आज घटनापीठाने हे प्रकरण पहिल्याच क्रमांकावर सुनावणीसाठी घेतलं होतं. पण आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे.

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीश उदय लळीत यांचा समावेश नाही. सत्ता संघर्षावरची महत्त्वाची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी, नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर पार पडला. निवडणूक आयोग पक्ष चिन्ह आणि शिवसेनेच्या नावासाठी निर्णय होणार असल्याची शक्यता होती परंतु आज घटनापीठाने हे प्रकरण पहिल्याच क्रमांकावर सुनावणीसाठी घेतलं होतं. पण आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊ नये अशी याचिका शिंदे गटाकडून दाखल कऱण्यात आली आहे. निवडणुका लढवण्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणाचं हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Exclusive : ‘हा’ बडा नेता गुरुवारी जाणार शिंदे गटात, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टाईला यश

आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version