भाजपच्या नेत्याने केला मोठा दावा, Raj Thackeray यांना निमंत्रण कारण ते VVIP, तर Uddhav Thackeray केवळ…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. तर दुसरीकडे राम मंदिर या मुद्यावरून देखील राज्यात अनेक घडामोडी या घडत आहेत.

भाजपच्या नेत्याने केला मोठा दावा, Raj Thackeray यांना निमंत्रण कारण ते VVIP, तर Uddhav Thackeray केवळ…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. तर दुसरीकडे राम मंदिर या मुद्यावरून देखील राज्यात अनेक घडामोडी या घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील अनेक गोष्टी घडत आहेत. दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) लोकार्पण सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारी आता सुरु झाली आहे. या सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. तर याच मुद्द्याला धरून भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.

गिरीश महाजन आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना महाजन यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंना बोलवण्याचं कारण काय? तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाहीत पण राज ठाकरे (Raj Thackeray) असतील, असे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. राम मंदिरावरुन ते टीका करतात. तसेच यावेळी माद्यांशी बोलत असताना गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. ते म्हणले आहेत की, घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. राज्याला आणि देशालाही माहिती आम्ही कारसेवक जेलमध्ये होते. घरात बसून भूमीका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे. आम्ही 20 दिवस जेलमध्ये होते. संजय राऊत, उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहे. संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा.

गिरीश महाजन म्हणाले, केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोद्धेच्या राम मंदीरावरुन आमच्यावर टीका केलीय त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल.

हे ही वाचा:

LIFESTYLE: MAKEUP करायच्या ‘या’ टिप्स तुम्हाला माहिती आहेत का?

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित,कोणत्या कलाकाराकडे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version