spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंच्या संपत्ती चौकशीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या माघे एका मागून एक संकट सुरूच आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरची आज सुनावणी पार पडली आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. याबाबतची सुनावणी आज न्यायालयात पार पडली.

गौरी भिडे यांनी आपल्या याचिकेतून उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली होती. ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी. आता त्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे याचा हिशोब लागत नाही असा आरोप भिडे यांनी केला आहे. यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीवर चौकशीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्या. दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर ४२ कोटी रुपये होता, तर साडे अकरा कोटी रुपये नफा कसा झाला? ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती.

कोण आहेत गौरी भिडे?

सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा ‘प्रबोधन’ प्रकाशनचा छापखाना जिथे आहे, त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ प्रकाशन हा छापखाना होता. केवळ सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणं, मातोश्री २ सारखी टोलेजंग इमारती उभी करणं, आलिशान गाड्या, फार्महाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. कारण आपलाही हाच व्यवसाय, तेवढेच परिश्रम असल्यानं मिळकतीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवालही या याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. वर्तमानपत्रांची छपाई, सर्क्युलेशन याचा हिशोब ठेवत त्याच्या दर्जाचे ग्रेडिंग करणारी एसीबी (ऑडिट सर्क्युलेशन ब्युरो) ही संस्था आहे. गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की, सामना आणि मार्मिक यांचे एसीबी ऑडिटच झालेलं नाही. तसेच कोरोनाककळातही प्रबोधन प्रकाशनचा ४२ लाखांचा टर्नओव्हर आणि ११.५ कोटींचा नफा कसा?, त्यामुळे हा पदाचा गैरवापर करत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे करत गोळा केलेला बेहिशोबी पैसा आहे, असा आरोप याचिकेतून करण्यात आला होता.

हे ही वाचा : 

संजय राऊतांच्या भाकितेवर शिंदे गटाचं प्रत्युत्तर; तुमचे आघाडी सरकार २५ वर्षं…

टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या मुलाचा हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss