spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

पुण्याच्या (Pune) चांदणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने येथीस वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

पुण्याच्या (Pune) चांदणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने येथीस वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून मुंबई- बंगळुरु (Mumbai-Bangalore)  महामार्गावरील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त केला जाणार आहे.

पुण्यात चांदणी चौकातील वाहतुककोंडीमुळे तेथील पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. येथील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुणेकरांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणचा दौरा केला आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसं जाहीर केलंय. १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान हा पूल पाडला जाईल. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाहीर केले जातील.

 काल (२७ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातीळ चांदणी चौकातील हायवेवरुन साताऱ्याला जात होते. त्यावेळी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला. शहरात सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याची चांदणी चौकात ताफा अडकल्यानंतर पुणेकरांनी त्यांना गाठलं. गेल्या दोन वर्षांच्या कोंडीबाबतची माहिती दिली. तुमची तर अवघ्या पंधरा मिनिटांत सुटका झाली पण आमचं काय? आम्ही या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न त्यांना विचारला. पुण्यातील वाहतूककोंडी हा पुणेकरांसाठी खूप मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात अनेकदा लोकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे मुख्यमंत्र्यांनील आज या चौकाची पाहणी केली आहे.

हे ही वाचा:

नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त

नोएडा ट्विन टॉवर्सची कथा’: सुपरटेक इमारती कशामुळे पाडल्या जाणार 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss