पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

पुण्याच्या (Pune) चांदणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने येथीस वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

पुण्याच्या (Pune) चांदणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने येथीस वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून मुंबई- बंगळुरु (Mumbai-Bangalore)  महामार्गावरील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त केला जाणार आहे.

पुण्यात चांदणी चौकातील वाहतुककोंडीमुळे तेथील पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. येथील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुणेकरांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणचा दौरा केला आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसं जाहीर केलंय. १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान हा पूल पाडला जाईल. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाहीर केले जातील.

हे ही वाचा:

नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त

नोएडा ट्विन टॉवर्सची कथा’: सुपरटेक इमारती कशामुळे पाडल्या जाणार 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version